Guinness World Record  sakal
ग्लोबल

Guinness World Record : पाण्याखाली ९३ दिवस राहिल्याने ‘तरुण तुर्क’;अमेरिकेतील संशोधनातील निरीक्षण,‘गिनेस वर्ल्ड’मध्ये नोंद

पाण्याखालील दबाव क्षेत्रात राहिल्याने मानवी शरीरावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी अमेरिकेचे निवृत्त नौदल अधिकारी आणि दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापक जोसेफ दितुरी हे अटलांटिक महासागराच्या तळाशी तब्बल ९३ दिवस राहिले.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पाण्याखालील दबाव क्षेत्रात राहिल्याने मानवी शरीरावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी अमेरिकेचे निवृत्त नौदल अधिकारी आणि दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापक जोसेफ दितुरी हे अटलांटिक महासागराच्या तळाशी तब्बल ९३ दिवस राहिले. पाण्याखाली तीन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर दितुरी (वय ५५) जेव्हा त्यांच्या लहानशा कुपीतून बाहेर पडले तेव्हा ते दहा वर्षांनी तरुण झाल्याचे पाहून शास्त्रज्ञांना धक्का बसला.

दितुरी गेल्या शुक्रवारी (ता.१७) पाण्याबाहेर आले. ते जैववैद्यकीय अभियंते असून ‘डॉ.डीप सी’ या टोपणनावाने ते ओळखले जातात. या प्रयोगासाठी त्यांनी पाण्याखालील ‘जुल्स अंडर सी लॉज’मध्ये प्रवेश केला. अमेरिकेतील की लार्गो लगूनच्या पृष्ठभागाखाली ३० फूट खाली बांधलेले ते एक पाण्याखालील हॉटेल आहे. काच व पोलादाचा वापर करून हे हॉटेल बांधलेले आहे.

पाण्याखालील स्थिर निवासस्थानात सर्वांत जास्त काळ राहिल्याबद्दल १३ मे रोजी दितुरी यांच्या नावाची नोंद ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. त्याआधी त्यांनी पाण्याखाली ७४ दिवस मुक्काम केला होता. गेल्या आठवड्यात पाण्याबाहेर आले तेव्हा त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला. ‘सीबीएस’शी बोलताना, दितुरीने म्हणाले की, विक्रम करण्यासाठी पाण्याखाली जास्त कालावधी राहण्याचे कधीच ठरविले नव्हते. पाण्याखालील जगात आणि अत्यंत दूर, टोकाच्या वातावरणात मानवी सहिष्णुता वाढवण्याचा उद्देश या मागे होता.

सागराच्या तळाशी पाण्याच्या प्रचंड दाबात दीर्घकाळ राहून मानवी शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. ‘प्रोजेक्ट नेपच्यून १००’ असे या प्रयोगाचे नाव होते. ‘मरिन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन’ या संस्थेने याचे आयोजन केले होते. १०० दिवस सागराखाली राहण्याच्या हा प्रयोग संशोधन आणि महासागर संवर्धन करण्यासाठी आखला असल्याचे ‘एमआरडीएफ’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे. दितुरी यांच्या शरीरात दिसलेले बदल पाण्याखालील दाबामुळे झाले आहेत. शरीरावर याचे अनेक सकारात्मक परिणाम होतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

बाह्य जगतापासून तुम्हाला दूर घेऊन जाणारी अशी एक जागा आवश्‍यक असते. लोकांना दोन आठवड्यांच्या सुट्टीसाठी येथे पाठवा. तिथे ते आरामदायी अनुभव घेऊ शकतात आणि हायपरबेरिक औषधाचा फायदा घेऊ शकतात.

-प्रा. जोसेफ दितुरी

हे बदल दिसले

शरीरातील ‘डीएनए’ आणि गुणसूत्रांच्या शेवटी आढळणाऱ्या प्रथिनांपासून बनलेली ‘टेलोमेरस’ ही रचना वाढत्या वयानुसार संकुचित होत असते. दितुरी पाण्याबाहेर आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या शरीरातील ‘टेलोमेरस’ हे तीन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत २० टक्के जास्त लांब झाले .त्यांच्या मूळ पेशींची संख्याही वाढली.

दितुरी यांच्या आरोग्यामध्ये विलक्षण परिवर्तन झाले

  • दितुरी यांनी अनुभवलेले बदल

  • झोपेच्या गुणवतत्तेत सुधारणा

  • कोलेस्टेरॉलची पातळी ७२ ने कमी झाली

  • शरीराचा दाह निम्म्याने कमी झाला

  • आठवड्यातून पाच दिवस एक तास व्यायाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT