ग्लोबल

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला पाक दरमहा देणार दीडलाख 

वृत्तसंस्था

इस्लामाबाद- मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रेहमान लखवीला खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीने आज मंजुरी दिली. 

लखवी हा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीने हा निर्णय घेतला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लखवीला दरमहा देण्यात येणाऱ्या दीड लाखांमध्ये जेवण (५० हजार), औषधे (४५ हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर (२० हजार), वकिलांचे शुल्क (२० हजार) आणि प्रवास (१५ हजार) यांच्यासाठीच्या खर्चांचा समावेश आहे. 

मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता. तो २०१५ पासून जामीनावर मुक्त आहे. केवळ दिखाव्यापुरस्ती त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याशिवाय अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही दरमहा पैसे देण्याची पाकिस्तानची विनंती संयुक्त राष्ट्रांनी मान्य केली आहे. त्यांनाही महिना दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. पाकिस्तानच्या अणुऊर्जा आयोगासाठी काम करत असताना बशीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी ओसामा बिन लादेनची भेट घेतली होती. नवाज शरीफ सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Electric Shock: शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना, उसाला पाणी देताना दुघर्टना, कुटुंबीयांचा आक्राेश!

Leopard Skin Smuggling : साताऱ्यापासून लातूरपर्यंत पसरलंय तस्करीचं जाळं; कोल्हापूर महामार्गावर बिबट्याची दोन कातडी जप्त, मोठी टोळी गजाआड

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT