Zakir-Naik 
ग्लोबल

... अखेर झाकिर नाईकने मागितली माफी

वृत्तसंस्था

क्वालालंपूर : सध्या मलेशियात वास्तव्यास असलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक याने केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. वंशवादी टिप्पणी केल्याबद्दल नाईकची मलेशियातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मलेशियात होऊ लागल्यानंतर नाईकने सारवासारव करीत माफीनामा सादर केला आहे. 

मलेशियातील हिंदूंना भारतातील मुस्लिमांपेक्षा शंभरपटीने अधिक अधिकार आहेत, असे विधान नाईक याने केले होते. तसेच, मलेशियातून आपली हकालपट्टी करण्यापूर्वी मलेशियातील चिनी नागरिकांची हकालपट्टी करावी, असेही नाईक म्हणाला होता. 

या वक्तव्यावरून नाईकवर जोरदार टीका होत आहे. वादग्रस्त विधाने करीत नाईक हा शांतता बिघडविण्याचे काम करीत आहे, असा आरोप केला जात आहे. चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर नाईकने माफी मागत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे म्हटले आहे. नाईकची सोमवारी (ता.19) पोलिसांनी दहा तास चौकशी केली होती. 

अमेरिकेतील 9/11चा हल्ला हा तेथील नागरिकांनीच केला होता, अशी मुक्ताफळे नाईक याने यापूर्वी उधळली होती. नाईकचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारताने केली होती. मात्र, मलेशियाने त्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT