Zakir-Naik esakal
ग्लोबल

Zakir Naik : मोठी बातमी! जाकीर नाईक भारताच्या हाती लागण्याची शक्यता; ओमानमध्ये होणार मोठं ऑपरेशन?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः कट्टरपंथी इस्लामिक उपदेशक जाकीर नाईकला ओमानवरुन भारतामध्ये आणलं जावू शकतं. नाईक हा २३ मार्चपासून ओमान दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

भारतीय गुप्तचर यंत्रणा ओमान येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यासंबंधीचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने 'न्यूज १८ हिंदी'ने दिले आहे. नाईक याला ओमानमध्ये दोन व्याखानं देण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याचे पहिले व्याख्यान 'कुरान अ ग्लोबल नीड' या विषयावर असणार आहे. ओमानच्या धर्मविषयक काम करणाऱ्या मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर दुसरं व्याख्यान पैगंबरांवर असणार आहे.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

ओमानमधील भारतीय दुतावास नाईकला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्थानिक कायद्यांतर्गत त्याला अटक करुन नंतर भारतात पाठवण्यासाठी तेथील एजन्सींच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाने ओमानी राजदूताकडे लावून धरले आहे.

ओमानमधील भारतीय राजदूतानेही हा मुद्दा ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर मांडला आहे. झाकीर नाईक याच्यावर भडकाऊ भाषणे, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. या आरोपांतर्गत ईडी आणि एनआयएने त्याला वाँटेड घोषित केले आहे. तो २०१७मध्ये मलेशियाला पळून गेला आणि तेथील नागरिकत्व घेतले. यावेळी तो पकडला जाणार का? हाच प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ; लसिथ मलिंगासह दोन भरवशाच्या सहकाऱ्यांनी सोडली साथ, हार्दिक पांड्याचं काय?

डॉक्टरांना घरी पाठवूया? आधी काव्याची कॉलेजमध्ये, आता सायलीची 'या' ठिकाणी होणार डिलिव्हरी; 'ठरलं तर मग'च्या ट्विस्टवर चाहते नाराज

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

SCROLL FOR NEXT