ग्लोबल

झूम कॉलवेळी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणाऱ्या सीईओला सक्तीची सुट्टी!

या झूम कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : Better.com चे सीईओ विशाल गर्ग यांनी झूमवरील ऑनलाइन मिटिंगदरम्यान ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. हा व्हिडिओ कॉल सोशल मीडियात व्हायरलही झाला, त्यानंतर अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळानं विशाल गर्ग यांच्यावर कारवाई केली असून तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. Better.com ही डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. (Zoom call firing CEO Vishal Garg taking time off with immediate effect)

सोशल मीडियात झूम मिटिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावर सडकून टीका झाल्यानं सीईओ विशाल गर्ग यांनी अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. आता गर्ग यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर कंपनीचे चीफ फानान्शिअल ऑफिसर केविन रियान कंपनीचे दररोजचं व्यवस्थापन पाहतील आणि संचालक मंडळाला रिपोर्ट करणार आहेत.

better.com कंपनीची स्थापना सन २०१६ मध्ये झाली असून याचं हेडक्वॉर्टर्स असून त्यांच्या ऑनलाइन मॉर्गेज आणि इन्शुरन्ससाठी काम करते. काही दिवसांपूर्वी झूम कॉलदरम्यान सीईओ विशाल गर्ग यांनी अमेरिका आणि भारतातील एकूण ९०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. कॉस्ट कटिंगसाठी कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

कोण आहेत विशाल गर्ग?

विशाल गर्ग हे 'वन झिरो कॅपिटल' या होल्डिंग कंपनीचे संस्थापक सदस्य देखील आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या गर्ग यांनी वयाच्या २१ व्या वर्षी 'मॉर्गन स्टॅनलीचा अॅनालिस्ट' प्रोग्राम सोडून प्रायव्हेट स्टुडंट लेंडर कंपनी 'माय रिच अंकल' सुरु केली होती. ही कंपनी सन २००५ मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाली होती. यानंतर या कंपनीला मेरिल लिंच यांनी खरेदी केलं होतं. यानंतर तिला बँक ऑफ अमेरिकानं टेकओव्हर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT