Devendra Fadnavis  sakal
Goa Assembly Election

उत्पल पर्रिकर, पार्सेकर निवडून येणार नाहीत - फडणवीस

धनंजय बिजले

पणजी : गोव्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसने सारा भर अल्पसंख्यांकांच्या ध्रुवीकरणावर दिला असल्याचा आरोप भाजपचे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गोव्याच्या रणधुमाळीत प्रचारात व्यस्त असलेल्या फडणवीस यांनी सकाळला दिलेल्या खास मुलाखतीत विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले.

: भाजपने येथील राजकीय संस्कृती बिघडविली असा कॉंग्रेसचा आरोप आहे?

:- हा आरोप म्हणजे शतकातील मोठा विनोद आहे. पाच वर्षांत सात मुख्यमंत्री देणाऱ्या पक्षाला हे शोभत नाही. त्यांनी राजकीय संस्कृतीबद्दल बोलणे केवळ हास्यास्पद आहे. भाजपने गोव्यात राजकीय स्थैर्य आणले. सलग दहा वर्षे स्थिर सरकार दिले.

: मात्र या स्थिरतेसाठी आमदारांची घाउक प्रमाणात फोडोफोडी केली असा विरोधकांचा आरोप आहे?

:- कॉंग्रेसचे इतके आमदार पक्ष सोडून का आले यावर त्यांच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे. आमचे सरकार असतानाही त्यांचे बारा लोक फूटून आमच्याकडे का आले? याचे कारण म्हणजे त्यांचा त्यांच्या नेतृत्वावरच विश्वास नाही.

: गोव्यात कॉंग्रेस पुन्हा स्पर्धेत आला असून कॉंग्रेसने कॅथलिक मतांवर लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जाते. त्यावर तुमची प्रतिक्रिया, रणनिती काय आहे?

:- गोव्यात कॉंग्रेसची बिलकुलच शक्ती नाही असे मी कधीच म्हणणार नाही. त्यांची येथे अनेक वर्षे सत्ता होती. मात्र आत्ता त्यांचा सगळा भर ध्रुवीकरणावर (पोलरायझेशन) आहे. मतदारांच्या मनात कुठे तरी भिती तयार करून अल्पसंख्यांक समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बहुसंख्यांकांना डावलून अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकायच्या ही कुठली धर्मनिरपेक्षता? यालाच आमचा विरोध आहे. आम्ही सर्वांसाठी काम केले. लोक सूज्ञ आहेत. ते आम्हाला बहुमत देतील.

: आम आदमी पक्ष व तृणमुल कॉंग्रेसमुळे भाजपविरोधी मतांची फाटाफूट होईल असे सुरुवातीला वाटले होते. आता तसे चित्र दिसन नाही. काय वाटते?

: - नुसत्या बॅनरबाजीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. काही तरी काम करावे लागते, विश्वास असावा लागतो. तृणमुलबाबत लोकांना वाटते की, हा गोव्याच्या लायक पक्षच नाही. त्यांचा राजकीय अत्याचार, हिंसाचार पाहिल्याने त्यांचे असे मत झाले आहे. माझ्या मते तृणमुलचा फटका महाराष्ट्रवादी गोमंतकवादी पक्षाला बसेल. मगोने काही केले असते चालले असते पण युती करून तृणमुलला गोव्यात आणायला नको होते असे लोकांचे मत आहे.

: शिवसेनेसारखा हिंदुत्ववादी पक्ष येथे भाजपच्या मतांवर परीणाम करेल का?

:- शिवसेना आता हिंदुत्ववादी पक्षच उरलेला नाही. हिंदुत्ववाद त्यांनी कधीच बासनात गुंडाळला आहे. गोव्याने त्यांना कधीही स्वीकारले नाही. त्यांचे डिपॉझिटही वाचत नाही. त्यामुळे त्यांचा बिलकुल परिणाम होणार नाही.

: भाजप प्रचारात पदोपदी दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे नाव घेतो. अशा वेळी उत्पलला पक्षात तुम्ही थांबवायला हवे होते असे आता वाटते का?

:- दिवंगत पर्रिकर यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. उत्पल राजकारणात यशस्वीच झाला पाहिजे या मताचा मी होतो. मी खूप प्रयत्न केला. पण त्यांनी पणजीतून लढण्याची भूमीकाच पक्की केली होती. एका मर्यादेनंतर काही करता येत नाही.

: बंडखोर उत्पल पर्रिकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून आले तर त्यांना भाजप सोबत घेणार का?

:- खरे सांगू, त्यांच्याबद्ल वाईट बोलणेही मला दुःखद वाटते. पण ते निवडून येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT