Babush Monserrate vs Manohar Parrikar & Utpal Parrikar  Sakal
Goa Assembly Election

आधी पर्रिकरांना दगा; आता मुलगा उत्पलला मात देत जिंकला BJP चा विश्वास

सुशांत जाधव

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झालाय. भाजपने पणजीतून तिकीट न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या मतदार संघातून बाबूश मोन्सेरात हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. पणजीत दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पलने (Utpal Parrikar) बंडखोरी केल्याने देशाचे लक्ष येथे लागले होते. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात (Babush Monserrate) व अपक्ष उत्पल यांच्यातच तुल्यबळ लढत होती. गेल्या वेळी मोन्सेरात अवघ्या 1758 मतांनी विजयी झाले होते.

गोव्यातील राजकारणाचा इतिहासात बाबूस मोन्सेरात यांचे राजकारण रंजक आणि कळण्यापलीकडचे राहिले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पणजीची जागा जिंकून देणाऱ्या बाबूस मोन्सेरा यांच्यामुळेच पर्रिकरांनी खूर्ची तर भाजपने सत्ता गमावली होती, हा देखील एक इतिहास आहे.

कोण आहेत बाबुश मोन्सेरात

गोव्यात अंतान्सिओ उर्फ बाबुश मोन्सेरात हे एक बडी आसामी म्हणून ओळखले जातात. 2002 च्या निवडणुकीपासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. बाबुश मोन्सेरात यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्षातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी 2 हजार मतांनी विजय मिळवला होता.

2002 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना तीन जागांची गरज होती. यावेळी बाबुश मोन्सेरात यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. पर्रिकर मुख्यमंत्री झाले. पण हे सरकार फार काळ टिकले नाही. 2005 मध्ये बाबुश मोन्सेरात यांनी पर्रिकरांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे मनोहर पर्रिकरांची खुर्चा गेली आणि भाजपने सत्ता गमावली होती. पर्रिकरांची साथ सोडून मोन्सेरात यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रतापसिंह राणे यांनी सरकार स्थापन केले. त्यांच्या सरकारमध्ये मोन्सेरात हे मंत्रीही राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT