Priyanka Gandhi Sakal
Goa Assembly Election

बेरोजगारीत गोव्याचा देशात दुसरा नंबर; प्रियांका गांधीचा हल्लाबोल

प्रियांका गांधी ह्या गोवा दौऱ्यावर असताना दक्षिण गोव्यात नुवेम येथील सभेत त्या बोलत होत्या.

दत्ता लवांडे

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या निवडणुकांत आपल्याला भाजपा (BJP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढाई पहायला मिलणार आहे. आपल्या उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कॉंग्रेसचे राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी ४ फेब्रुवारीला गोवा दौरा केला होता. (Goa Assembly Election Updates)

तसेच आता नेत्या प्रियांका गांधी ह्या गोवा दौऱ्यावर आहेत. दक्षिण गोव्यात नुवेम येथील सभेत त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी बोलताना '' गोव्याच्या निवडणुका या फक्त राजकीय पक्षांसाठी मर्यादित नसून त्या गोव्याच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हे राज्य अनेक गोष्टींच्या संसाधनांसाठी, नैसर्गिक साधनसंपत्ती, सौंदर्य, आणि कलेसाठी समृद्ध आहे. पण सध्या बेरोजगारीत या राज्याचा देशात दुसरा नंबर लागतो.'' असं म्हणत त्यांनी भाजपा वर खोचक टीका केली आहे.

दरम्यान राहूल गांधी यांनी ४ तारखेला सभा आणि रॅली घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि कॉंग्रेसची गोव्यात युती असून कॉंग्रेसचे ३७ आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT