Goa Assembly MLA Oath e sakal
Goa Assembly Election

गोव्यात मुख्यमंत्रिपदावरून पेच, प्रमोद सावंतांचा पत्ता कट?

सकाळ डिजिटल टीम

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Election Result) १० मार्चला जाहीर झाले आहेत. भाजपने (BJP) ४० पैकी २० जागा मिळवून अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. येत्या मंगळवारी आमदारांचा शपथविधी होणार आहे. पण, अद्यापही मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा झाली नाही. पक्षातील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास उशिर होत आहे, असं बोलले जात आहे. पण, पक्षामध्ये कुठलेही वाद नाही, असं गोवा भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

गोवा विधानसभेची (Goa Assembly) मुदत १६ मार्चला संपत आहे. त्यामुळे इथं लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. भाजप आमदारांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार मंगळवारी शपथविधी होणार आहे. पण, आमदार विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याची माहिती आहे. त्यांनी शनिवारी अचानक राज्यपालांची भेट देखील घेतली होती. तसेच दिव्या राणे या विश्वजीत राणे यांच्या पत्नी असून त्या परवेम विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी एका मराठी वृत्तपत्रात मोठी जाहिरात दिली असून त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा फोटो नाही. त्यामुळे प्रमोद सावंत यांचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

गोव्यात मुख्यमंत्र्यांबाबत अजूनही संभ्रम आहे. भाजप नेते विश्वजित राणे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे. गोव्यात भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या असून काही अपक्ष आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. प्रमोद सावंत यांना त्यांची जागा अत्यंत कमी मतांनी जिंकता आली आहे. अशा स्थितीत यावेळी राज्याची सूत्रे कोण हाती घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT