Michael Lobo esakal
Goa Assembly Election

येत्या 10 महिन्यांत गोव्यात काँग्रेसचं सरकार असेल : आमदार मायकल लोबो

सकाळ डिजिटल टीम

'आमचा पक्ष लवकरच गती पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल.'

पणजी : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झालाय. गोवा विधानसभा निवडणुकीतही (Goa Assembly Election) काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय. गोव्यात मोठा विजय मिळवत भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलीय. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. अशावेळी काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी मोठा दावा केलाय.

गोव्याच्या राजकारणात काहीही असंभव नाही. गोव्यातील वास्तव पाहता गोव्यात अचानक बदल होऊ शकतो. आम्ही येणाऱ्या काही महिन्यात सरकार बनवू आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. एक-दीड वर्षात आम्ही सरकार बनवण्यात सक्षम होवू, असा दावाही लोबो यांनी केलाय.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार लोबोंना विचारण्यात आलं की, भाजपकडं (BJP) 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळं त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी संख्याबळ कसं गोळा कराल? त्यावर लोबो म्हणाले, पुढील वर्ष खूप महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष लवकरच गती पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केलाय. सध्या आमच्याकडं 15 आमदारांचं संख्याबळ आहे. तीन अपक्ष आणि दोन जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं (Maharashtrawadi Gomantak Party) जिंकल्या आहेत. त्यामुळं काहीही होऊ शकतं, असंही लोबोंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT