Shivsena leader Sanjay Raut's Four member corona positive  esakal
Goa Assembly Election

'आमच्याकडे 'नोटा' कमी असल्याने...', गोव्यात डिपॉझिट जप्त झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होत आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ झालाय. शिवसेनेच्या हा पराभव जिव्हारी लागण्याची शक्यता असतानाच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं. हा क्रांतीकारी आणि ऐतिहासिक आहे, असं ते म्हणाले. (Sanjay Raut Speaks on Goa Assembly Election 2022)

गोव्यात नोटा ला शिवसेनेपेक्षा जास्त मतं पडली. यामुळे राष्ट्रवादी आणि सेनेचा सुपडा साफ झालाय. त्यावर बोलताना, आमच्याकडे नोटा नसल्याने असं झाल्याचं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं. भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो, असं त्यांनी म्हटलं.

काय म्हणाले राऊत?

- लोकशाहीत ज्याचा विजय होतो त्याचं अभिनंदन करायची परंपरा आहे

- मी भाजपचं अभिनंदन करतो

- काँग्रेस गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये हारलीय

- अखिलेश यांचा परफाॅर्मन्स देखील अपेक्षा पेक्षा खराब होता

- लोकांनी विकल्प शोधण्याचा पर्याय निवडला

- आम्ही लढलो.. ही लढाई चालू राहिल, विजय पराजय अंतिम नसतो

- भाजपनं विजय पचवायला शिकलं पाहिजे

उत्तर प्रदेशात विरोधकांना एकत्र आणण्यात अपयश

- भविष्यात विरोधी पक्ष काम करताना नियोजनपूर्वक विचार करु

- काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेत बदल करावा लागेल

- उत्तर प्रदेशात मोठा असंतोष होता मात्र फायदा घेता आला नाही

आॅन गिरीश महाजन आवाहन टू संजय राऊत

- मगाशीच म्हणालो अजिरणाच्या ढेकरा आहेत

- त्यामुळे दुसऱ्यांना आवाहन देण्याऐवजी मीच तुम्हाला आवाहन देतो की तुम्हीच निवडणून आणून दाखवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SRH vs KKR: सुनील नरेनचे इतिहास घडवला, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच ठरला! हैदराबादचा संघ कोलकातासमोर १७० च्या आत ऑलआऊट

"तिने मला ओळखच दाखवली नाही" अश्विनी भावेंवर महेश टिळेकरांनी व्यक्त केली नाराजी "मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो"

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

SCROLL FOR NEXT