Gondia News esakal
Nagpur_old

Gondia News: जिल्हा हादरला! विहिरीतील विषारी वायूमुळे चौघांचा मृत्यू; गावावर शोककळा

सकाळ डिजिटल टीम

तिरोडा (जि. गोंदिया): घरगुती विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील सरांडी येथे बुधवारी (ता. २८) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

खेमराज गिरधारी साठवणे (वय ४४), प्रकाश सदाशिव भोंगाडे (४०), सचिन यशवंत भोंगाडे (२८), महेंद्र सुखराम राऊत (३४, सर्व रा. सरांडी) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

खेमराज साठवणे हे सकाळी घराच्या मागील भागात असलेल्या घरच्या विहिरीत बंद पडलेली मोटर काढण्याकरिता उतरले होते. १५ ते २० मिनिटे होऊनही ते विहिरीबाहेर आले नाही.

त्यामुळे खेमराजचा भाऊ प्रल्हाद हा शेजारच्यांना बोलवायला गेला. शेजारी राहणारे सचिन भोंगाडे खेमराजला शोधण्यासाठी विहिरीत उतरला. तो विहिरीत उतरत असताना काही अंतरानंतर खाली पडला.

हे बघून त्याला वाचविण्याकरिता सचिनचा काका प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत हेदेखील विहिरीत उतरले. मात्र, तेदेखील विहिरीत खाली पडले. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी लक्ष्मण लिल्हारे हे मोटारीचा वीजपुरवठा बंद करून विहिरीत उतरले.

पण आत श्वास गुदमरत असल्याचे लक्षात येताच ते परत वर आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

विहिरीत विषारी वायू आहे का, हे तपासण्यासाठी काही जणांनी कोंबडीचे पिल्लू दोरीने बांधून विहिरीत सोडले असता ते पिल्लू देखील मरण पावले. त्यामुळे चारही जणांचा विषारी वायूमुळेच मृत्यू झाला, हे स्पष्ट झाले.

प्रशासनाने चौघांचेही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेने सरांडी गावावर शोककळा पसरली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीसुद्धा सरांडी येथील भुरे यांच्या घरी असलेल्या विहिरीत विषारी वायुमुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT