health-fitness-wellness

फोकस फ्रेश दिसण्यावर! 

आरोह वेलणकर, अभिनेता

फिटनेस अन् वेलनेस या गोष्टी प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण, यावरच आपलं आरोग्य अवलंबून असतं. मी ‘रेगे’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. त्यावेळी माझं वजन ५२ किलो होतं. त्यानंतर कोणतीही सप्लिमेंट न घेता मी तब्बल १८ किलो वजन वाढविलं. त्यासाठी मला दीड वर्ष कष्ट घ्यावे लागले. मी सिक्‍सपॅकही केलं. त्यानंतर मी आरोग्य अन् तंदुरुस्तीच्या दृष्टीनं ‘फिट’ झालो. आता मला कोणीही वजन कमी वा जास्त करण्यास सांगितले, तरी ते मी एक ते दीड महिन्यात करू शकतो. कारण, आता मला माझ्या शरीराचा अंदाज आला आहे. मी सात वर्षांपासून नियमितपणे वर्कआऊट करत आहे. राम गोपाल वर्मा यांच्या ‘होस्टेल डेज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला वजन वाढवावं लागलं होतं. कमी कालावधीत मी हे आव्हान स्वीकारलं आणि भूमिकेला अनुसरून माझी शरीरयष्टी केली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी सध्या झी वाहिनीवर ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत अभिनय करत आहे. त्यामुळं मला घरातून सकाळी सातवाजता बाहेर पडावं लागतं. रात्री अकरा वाजता घरी परततो. त्यातही मी माझं डाएट व्यवस्थित सांभाळतो. सकाळी उठल्यानंतर मी एक ग्लास दूध व दोन केळी खातो. सेटवर आल्यानंतर दमदार ब्रेकफास्ट घेतो. मी घरी बनविलेले सॅण्डवीच आणतो. त्यात चीजचा भरपूर वापर केलेला असतो. त्यानंतर उपमा, इडली वा पोहे खातो. दुपारच्या जेवणामध्ये चिकन, मटण वा मासे खातो. त्याचबरोबर दिवसभरात तीन अंडी खातो. याचबरोबर प्रोटिन इंटे‍क हाय ठेवतो. त्यासाठी ड्राय फ्रुट्‌स, चीज क्‍यूबचा माढ्या आहारात समावेश असतो. काहीही झाले तरी मी डाएट बिघडू देत नाही. मी दर दोन तासांनी काही ना काही खातच असतो. त्यामुळं थकवा जाणवत नाही आणि ऊर्जाही मिळत राहते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे जीम बंद आहेत. तरीही मी व्यायामामध्ये खंड पडू दिला नाही. मी सेटवर जातानाच १० किलोचे डंबेल्स बरोबर घेऊन जातो. चित्रीकरणामधून वेळ मिळतो, त्यावेळी मी वर्कआऊट करतो. मात्र, ते फार हेवी म्हणजे घाम निघेपर्यंत करत नाही. सध्या माझा मसल्स लॉसही झाला आहे. मात्र, फ्रेश दिसण्यावरच माझा जास्त फोकस आहे. जीम केव्हा उघडतील, याची मी आतुरतेने वाट पहात आहे. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT