green tea
green tea 
health-fitness-wellness

हेल्थ टिप्स: आरोग्य उत्तम राखण्यासाठी समतोल आहार खूप गरजेचा

सकाळवृत्तसेवा

आरोग्य उत्तम राखण्यासाठी समतोल आहार खूप गरजेचा आहे. अलीकडे आरोग्य, फिटनेस आणि आहार याविषयी खूप जागरूकता दिसते. 

  • ग्रीन टीचे सेवन दररोज केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये कर्करोगाशी लढण्याचीही क्षमता आहे. 
  • ग्रीन टीबरोबर काळे मिरे म्हणजे सोने पे सुहागा. या दोन्ही पदार्थांमधले अँटी ऑक्‍सिडंट हृदयरोगाला दूर ठेवण्यास मदत करते. 
  • ऑलिव्ह ऑइल आणि टोमॅटो यांचे दररोज सेवन शरीरातील फॅटी ऍसिड कमी करण्यास मदत करते. 
  • केळी हे सहज उपलब्ध होणारे फळ आहे. केळीमध्ये मॅग्नेशिअम, कॉपर, फायबर, कॅल्शिअम, पोटॅशियम, तसेच व्हिटॅमिन सी, ई, ए व क भरपूर प्रमाणात असते. केळीचा समावेश रोजच्या आहारात असावा. 
  • डार्क चॉकलेट हृदयक्रिया उत्तम राखण्यास मदत करते. डार्क चॉकलेटबरोबर रोज एक सफरचंद खाल्ल्यास या दोन्हींचे कॉम्बिनेशन हृदयरोग्यांना लाभदायक ठरते. 
  • शरीर आणि मन यांचे परस्परांशी नाते आहे; त्यामुळे व्यायाम किंवा वॉक घेताना मन प्रसन्न ठेवावे. एखाद्या घटनेचा किंवा दिवसभरात काय काय करायचे आहे, याचा विचार करू नये. 
  • जास्त व्यायाम केला किंवा जास्त वॉक घेतला की लगेचच आपण तंदुरुस्त झालो, असे होत नाही. 
  • व्यायामामध्ये सातत्य ठेवावे; मात्र प्रकृती ठीक नसताना विश्रांती घ्यावी.
  • व्यायाम किंवा वॉक घेऊन झाल्यानंतर लगेचच पाणी घेऊ नये.
  • व्यायाम किंवा वॉक घेत असताना थकवा जाणवल्यास लगेचच विश्रांती घ्यावी.
  • व्यायाम करणाऱ्या तरुणांमध्ये शक्‍य तेवढ्या लवकर शरीरसंपदा कमावण्याकडे कल असतो. त्यासाठी सप्लिमेंटचा आधार घेतला जातो; पण डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच सप्लिमेंटचा वापर करावा. दूध, अंडी, फळे हा उत्तम आहार आहे.
  • नवोदितांनी सूर्यनमस्कार आणि लाकडी डंबेल्सने व्यायाम सुरू करावा.
  • व्यायामशाळेत डबलबारवर कसरत करताना सावधगिरी बाळगावी.
  • वाढत्या वयाबरोबर गुडघा आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. अशा वेळी या अवयवांवर ताण येणार नाही, अशा प्रकारे व्यायामाचे प्रकार करावेत.
  • संगणकीकरणामुळे सातत्याने खुर्चीत बसावे लागल्याने स्नायू आखडतात. अशा वेळी काही ठराविक वेळानंतर खुर्चीतून उठून हात-पाय मोकळे करावेत.
  • खुर्चीत बसल्या-बसल्याही व्यायामाचे काही हलके प्रकार करता येतात.
  • उंच इमारतीत पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर कार्यालय असल्यास जिन्याच्या वापरानेही पायांना व्यायाम मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT