Bai
Bai 
health-fitness-wellness

योग ‘ऊर्जा’ : स्वतःसाठी जगा... वीकएण्डसाठी नाही!!

देवयानी एम., योग प्रशिक्षक

‘Monday Blues’ हे शब्द आपण सर्वांनी ऐकले आहेत, आपल्यातील अनेकांनी अनुभवलेही आहेत. ‘मंडे ब्लूज’ म्हणजे एक प्रकारचा कंटाळा, आळस, विकेंड संपल्याची खंत आणि पुढील दिवसाप्रति निरुत्साह. तो फक्त सोमवार पुरताच मर्यादित नसून, जेव्हा ‘ब्लू’ वाटेल तेव्हा थोडा व्यापक विचार व्हायला हवा. आपल्या आत डोकावून याचा शोध घ्यायला हवा. कारण आरोग्याबद्दल बोलताना शरीराची तंदुरुस्ती आणि मनाचा उत्साह या दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या बाबी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉर्पोरेट जगात स्ट्रेस खूप असतो, असे म्हणतात. तो स्ट्रेस म्हणजे एकच सरसकट घटक नाही. अनेक तास एका जागी बसून काम, आखडलेले शरीर, कामाच्या दीर्घ वेळा, डेडलाईन्सचा ताण, नात्यांना पुरेसा वेळ न देता येणे, कामात प्रगती खुंटल्याची भावना, जीवनशैलीमधील तफावत, कमी वयातच होणाऱ्या शारीरिक व्याधी, ध्येयहीन वाटणे अशी अनेक कारणे स्ट्रेस वाढायला कारणीभूत ठरतात. काही वर्षे गेल्यावर कामाविषयीच नाही, तर आयुष्याबद्दलच औदासिन्य येत जाते. मग यातून मार्ग कसा काढला जातो, तर विकेंडची वाट पाहत! सोमवारी सकाळी निरुत्साहात आठवडा सुरू करत, गुरुवारीच वीकएण्डची चाहूल लागायला लागते. आजकाल तर ‘मिड-विक ब्लूज’ही येऊ लागले आहेत म्हणे! मग आपण फक्त वीकएण्डपुरते जगतो आणि वीकएण्डपुरतेच उत्साही असतो का? 

आपल्या आयुष्याची ‘excitement’ वीकएण्ड पुरती असूच शकत नाही. असे काय करता येईल ज्याने आपले संपूर्ण आयुष्य, त्यातील प्रत्येक मिनिट ‘interesting’ असेल. आता तुम्ही म्हणाल या लेखात मी योगावर लिहिते म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं योगापर्यंत नेऊन सोडते. योग म्हणजे नक्की काय आहे हे समजले, तर तुम्हालाही पटेल की सगळी उत्तरे योगात आहेत असे म्हणण्यापेक्षा सगळी उत्तरे आपल्या आतच आहेत. आणि ‘योग’ बाहेर लडबडलेल्या आपल्या मनाला आत वळवतो, जिथूनच सर्व उत्तरे मिळणार आहेत. पैशात, करमणुकीत, व्यसनात, अनावश्यक संग्रहात, जनसंगात किंवा कोणत्याही बाह्य वस्तूत आनंद व समाधान हे तात्पुरतेच असते. तेच समाधान आणि आनंद हे दीर्घकाळ टिकावे अशी इच्छा असल्यास योगासनांकडे वळावेच लागेल. 

कल्पना करा, प्रत्येक कर्मात उत्साह, नवनिर्मितीचा आनंद, जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समाधान असल्यास तोच जॉब, तीच माणसे, तेच रस्ते आणि तुमचे रोजचे आयुष्य सुंदर वाटू लागेल. मग कामात लक्ष जास्त लागेल, कामाची गुणवत्ता वाढेल, प्रॉडक्टिव्हिटी, एकाग्रता वाढेल आणि वीकएण्डची आठवण कमी येऊ लागेल. 

मला अतिशय आनंद होतो की, अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी योगासनांची पॅकेज दिलेली आहेत. त्यांना स्वतःच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी वेगळा वेळ आणि त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. योगासनांची ऊर्जा त्या सर्वांना मिळत आहेच, परंतु ती आणखी लोकांपर्यंत पोचवण्याची माझी इच्छा मला वीकएण्डची आठवण येऊच देत नाही. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT