Old-People 
health-fitness-wellness

लाइफस्टाइल कोच : ज्येष्ठांसाठी आरोग्यमंत्र

डॉ. मनीषा बंदिष्टी

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीसाठी हितकारक असणारे जीवनशैलीतले काही बदल आपण आज बघणार आहोत. जवळच्या व्यक्ती, करिअर आणि स्वातंत्र्य या गोष्टी दुरावल्यानं या व्यक्ती आधीच भावनिकदृष्ट्या खचलेल्या असतात. दुसरीकडं त्यांचं शरीर तरुणांइतकं बळकट आणि ऊर्जेनं परिपूर्ण नसतं. त्यामुळं सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची काळजी खासकरून घ्यायला हवी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोज व्यायाम करा
व्यायामामुळं आपली प्रतिकारशक्ती एकूणच वाढत असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती हा अगदी कळीचा मुद्दा असल्यामुळं त्यांनी त्याबाबत काही तडजोड करता कामा नये. 

1) व्यायामामुळं वजन मेंटेन होतं आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. 
2) पेशींना ऑक्सिजन आणि पोषकद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या यंत्रणांचं आरोग्य वाढतं. 
3) पडणं आणि जखमी होणं या घटनाही कमी होतात. 

पोषणदृष्ट्या ‘फिट’ बना
आहाराबाबतच्या चांगल्या सवयी असण्याची कधी नव्हे इतकी गरज सध्या निर्माण झाली आहे. मात्र, जसजसं वय वाढतं, तसे तुमच्यात काही बदल होतात, चयापचयाची प्रक्रिया मंदावते; तसंच वास आणि चव याबाबतच्या संवेदना कमी होतात. याचा तुमच्या आहारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं या सगळ्या मर्यादा मान्य करूनही पोषणाबाबत जास्तीत जास्त जागरूक राहण्याची गरज आहे.

1) नियमित अंतरानं; पण कमी प्रमाणात खात राहा. 
2) नट्स, फळं, पालेभाज्या, सीड्स, नाचणी (रगी), काळे चणे, बाजरी (पर्ल मिलेट), राजगिरा, आवळा यांसारखे पोषकद्रव्यं असलेले पदार्थ आहारात ठेवा. 
3) ब्रेड, साखर असलेले ज्युसेस, पास्ता, खूप बटर इत्यादी गोष्टी टाळा.
 

भावनिकदृष्ट्या स्थिर राहा
वार्धक्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी ध्यानधारणा ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच मदत करू शकते. ध्यानधारणा मेंदूतल्या स्मृती केंद्रांना ‘स्टिम्युलेट’ करते. ताण कमी करण्यासाठीचं ध्यानधारणा हे अतिशय उपयुक्त आणि प्रभावी माध्यम आहे. नकारात्मक विचार आणि भावना यांचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी शरीर आणि मन यांच्यातला समन्वय दृढ करणारं हे शास्त्र आहे.

1) ध्यानधारणेमुळं मूड आणि भावना यांच्यात सुधारणा होते. 
2) स्मृती सुधारते. 
3) रिलॅक्सेशन आणि मानसिक शांती वाढते.
 

‘वय ही केवळ एक संख्या आहे,’ असं म्हटलं जातं; मात्र तुम्ही प्रयत्न केलेत आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूकता बाळगली तरच ते सिद्ध होते, हेही लक्षात ठेवा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT