Blood Pressure Control 
health-fitness-wellness

तणावामुळे बीपीचा त्रास होतोय ! हे उपाय करून औषध न घेता बीपी आणा नियंत्रणात

सकाळ ऑनलाईन टीम

जेव्हा रक्तवाहिन्यातून रक्त वाहण्यास अडथळा वाढतो, तेव्हा हृदयाला सामन्यापेक्षा अधिक काम करावे लागते. या अतिरिक्त दाबाला उच्च रक्तदाब म्हटले जाते. सोप्या भाषेत म्हटले तर सामान्य रक्तदाबाची पातळी १२० ते ८० असते. जेव्हा रक्तदाबाचा स्तर यापेक्षा अधिक असतो तेव्हा त्यास अतिउच्च रक्तदाब म्हटले जाते. हेल्थलाईनच्या एका अहवालानुसार जगात एक अब्जापेक्षा अधिक लोकांना उच्च रक्तदाब या व्याधीने आजारी असतात. हा आजार हृदयविकाराच्या सुरुवातीचे कारणांपैकी एक असू शकते. तसेच उच्च रक्तदाब किडनी व ब्रेन स्ट्रोक या व्याधींची जोखीम ही वाढण्यास कारणीभूत ठरते. 

१.उच्च रक्तदाबाचा त्रास का होतो? 

सर्वसाधारण रक्तदाब हा ८५ पेक्षा वर जात नाही. रक्तदाब वाढण्यामागे बदलती जीवनशैली, तणाव, थकवा आणि अवेळी जेवण हे प्रमुख कारणे मानली जातात. दुसरीकडे खाण्यात मिठाचा अतिरिक्त वापर केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो. या व्यतिरिक्त जे लोक अगोदरपासून बीपीचे रुग्ण आहेत. त्यांनी जर औषध घेणे सोडून दिल्यास त्यांचा बीपीही वाढू शकतो. शारीरिक हालचाल न होणे, धूम्रपान किंवा दारुचे अतिसेवन केल्यानेही बीपी वाढण्याचे कारण समजले जाते. 


२.रक्तदाबाची काय आहेत लक्षणे?
डोकेदुखी, घेरी येणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, अस्वस्थता, अंधुक दिसणे आणि नाकातून रक्त येणे हे सर्व उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार जीवनात संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा अवलंब केल्यास उच्च रक्तदाबास नैसर्गिकरित्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिक बजावू शकते. 


३.संतुलित आहार महत्त्वाचा!
आरोग्य तज्ज्ञांनुसार जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर मिठाचे सेवन कमीत कमी करा. त्यांच्या म्हणण्यानुसार उच्च रक्तदाबाचे ४०-५० टक्के रुग्णांमध्ये मिठाचे सेवन नियंत्रित केल्यास रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कमी कोलॅस्ट्रोलयुक्त अन्न, पौष्टिकतत्त्वांनी पूर्ण खाद्यपदार्थ, पोटॅशियमचे स्त्रोतांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकते. 


४.या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या
उच्च रक्तदाब हृदयविकार, स्ट्रोक, मेंदूला इजा या सारख्या गंभीर व्याधींचे कारण होऊ शकते. अशा स्थितीत नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे. व्यायाम, योगा, सकाळी फिरणे, तणावमुक्त जीवन जगल्यास रक्तदाब नियंत्रणात राहते.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपादन - गणेश पिटेकर   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RR Qualifier 2: ऐकावे ते नवलच... वैभव सूर्यवंशी अन् रवींद्र जडेजा यांच्या एकाच सामन्यात दोन वेगवेगळ्या अर्धशतकी भागीदारी

AI Travel: एआय युगातील ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीला नवी दिशा मिळणार! प्रवास बुकिंगचा अनुभव बदलणार; तीन दिग्गज कंपन्यांची भागीदारी

Pune Census : जनगणना कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण द्या; महापौर, आयुक्तांची मागणी

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Talegaon Station News : १०० मीटरचे काम, वाहतूक मात्र दिवसभर जाम; चाकण एमआयडीसीतील भांबोली ते चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडीचा शुक्रवार

SCROLL FOR NEXT