Sesame 
health-fitness-wellness

भारतीय पोषण खजिना : बहुगुणी तीळ

डॉ. मनीषा बंदिष्टी

आपल्याकडे अनेक प्रकारच्या भाज्या, डाळी, कडधान्यं, फळं पिकतात. त्यांचे आरोग्यविषयक फायदे माहीत नसल्यानं किंवा फास्ट फूडच्या अति मार्केटिंगमुळे त्यांचा वापर भारतीय पदार्थांत कमी होत चालला आहे. त्यांचे फायदे तरुण पिढीला माहीत करून देणं आवश्यक आहे. अन्यथा, हा भारतीय पोषण खजिना लुप्त होण्याची भीती आहे. या मालिकेत आपण अतिशय पोषक भारतीय अन्नघटकांची माहिती करून घेत आहोत. आज आपण तिळाची (सेसमे सीड्स) माहिती करून घेऊ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • तिळाचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांना भारतात ‘विंटर स्पेशल फूड’ असं म्हटलं जातं. 
  • ते त्यांच्या तेलासाठी अतिशय मोलाचे असतात. तीळ म्हणजे छोट्या बिया असल्या, तरी त्यांचे फायदे मात्र प्रचंड असतात.
  • पोषक असलेल्या तिळाचा तुम्ही तुमच्या डाळी, भात, नूडल्स किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये योग्य पद्धतीनं वापर करू शकता. तीळ योगर्ट किंवा स्मूदीमध्येसुद्धा मिसळून तुम्ही त्यांना खास अशी चव देऊ शकता. 

महत्त्वाचे घटक

  • तिळामध्ये तांबे, मँगेनीझ, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम आदी खनिजं मोठ्या प्रमाणात असतात.
  • तिळामध्ये असलेलं तांबे काही प्रमाणात संधिवातामुळे (ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिस) यांच्यामुळे होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी मानलं जातं.
  • मॅग्नेशियममुळे रक्तवहिन्यांबाबतचं, श्वसनमार्गाबाबतचं आरोग्य सुधारतं आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • तिळात कॅल्शियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं; ज्यामुळे हाडांची ताकद वाढण्यास मदत होते.

तिळाचे फायदे
एकुणात तिळाचे फायदे असे आहेत 

1) केसांची वाढ : तिळामुळे केसांची मुळं घट्ट होतात. तिळात असलेल्या ओमेगा फॅटी ॲसिड्समुळे केसांची वाढ उत्तम व्हायला मदत होते आणि केसांचं तुटणंही सुधारलं जातं. 

2) अँटी-एजिंग प्रॉपर्टीज : तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप असतात; ज्यामुळे वार्धक्याच्या खुणा कमी होतात आणि त्वचा अधिक तरुण दिसायला लागते. 

3) त्वचेचं आरोग्य : तिळात असलेल्या तेलामुळे त्वचेला खूप उपयोग होतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि नरम होण्यास मदत होते. सूज कमी करण्यासाठीचे घटक त्यात भरपूर असतात. 

4) पचनात सुधारणा : काळ्या तिळामध्ये फायबर्स आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणावर असल्यानं बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT