Shilpa-Desai 
health-fitness-wellness

माझा फिटनेस : फिटनेसबाबत स्वतःचा आदर्श

शिल्पा देसाई, अभिनेत्री

माझ्यासाठी वेलनेस म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या फिट असणं नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक संतुलन असणं आहे. सध्या कोरोनाच्या काळात शारीरिकरित्या फिट असणं महत्त्वाचं आहे, तितकंच मानसिकरित्या सुदृढ असणं गरजेचं आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी मी दररोज घरी पिलाटेस आणि योगा असे अल्टरनेट व्यायाम करते. रोज संध्याकाळी जॉगिंगला जाते. पण, सध्या कोरोनामुळं आउटडोअर वर्कआऊट आणि जिम करत नाही. मी मुळात खूप फूडी आहे. मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात. स्ट्रीट फूडसुद्धा खूप आवडतात, पण नेहमीच हे सगळं खाणं शक्‍य होत नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कधीतरी ‘चिट डे’ म्हणून हे सगळं मी खाते, पण इतरवेळी माझा आहार नेहमी ठरलेल्या वेळेतच असतो. मला प्रोटिन्स जास्त प्रमाणात घेणं आवडतं. हिरव्या भाज्या, सलाड, अंडी, ड्रायफ्रुट या गोष्टी प्रामुख्यानं माझ्या आहारात असतात. याशिवाय, भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यानं त्वचेलासुद्धा ग्लो येतो. 

मी व्यायाम शक्‍यतो सकाळी करते. कामामुळं वेळ नाहीच मिळाला, तर संध्याकाळी करते. फिट राहण्यासाठी जिमलाच जायला लागतं, असं मला वाटत नाही. आपण घरच्या घरी किंवा आउटडोअर व्यायाम करून आणि संतुलित आहार घेऊन तितकंच फिट राहू शकतो, हे मिलिंद सोमण यांच्याकडं पाहिलं की कळतं. त्यामुळं मी त्यांना माझ्या फिटनेसचा गुरू मानते. मानसिक संतुलन राखण्यासाठी दिवसातून एक तास तरी मेडिटेशन करते. त्याचबरोबर गाणी ऐकणं हे माझ्यासाठी एका प्रकारे रिचार्ज होण्यासारखं आहे. त्यामुळं स्वतःला फ्रेश आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मी गाणी ऐकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः पॉझिटिव्ह असतो आणि इतरांचा चांगला विचार करतो, तेव्हा आपोआपच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. 

मला एका शोसाठी माझ्या वयापेक्षा मोठं दिसणं गरजेचं होतं. त्या प्रोजेक्‍टसाठी मी माझं वजन १० किलो वाढवलं होतं. पण, ते वजन माझ्या इतर कामांसाठी चालणारं नव्हतं. त्यामुळं तो प्रोजेक्‍ट संपल्यावर मी लगेचच किटो डाएटवर गेले आणि माझं वजन पुन्हा कमी केलं. फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत मी स्वतःचाच आदर्श नेहमी ठेवते. कारण आपली स्पर्धा ही स्वतःशीच असते. मी आज आहे, त्यापेक्षा मला उद्या किती चांगलं होता येईल, हाच नेहमी माझा आदर्श आणि प्रयत्न असेल. 
शब्दांकन ः अरुण सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT