benefits of eating eggplant nagpur news 
health-fitness-wellness

हृदयापासून तर कँसरपर्यंत सर्व आजारांवर रामबाण उपाय, वांगी खा अन् बिनधास्त जगा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : वांग्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. वांगी खाल्ल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. यामध्ये क, के आणि बी6 सारखे जीवनसत्व आणि पोटॅशिअम, मॅग्नीज, फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. तसेच वांग्यांच्या झाडाची पाने ही अनेक जखमी भरण्यासाठी देखील वापरले जातात. उन्हाळ्यामध्ये वांग्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मात्र, तुम्हाला वांग्यांच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का?

पचनक्षमता सुधारण्यास मदत -
वांग्यामध्ये पाण्यासोबत फायबर मोठ्या प्रमात असतात. तसेच यामध्ये असणारे अँटीऑक्सीडडंट्स आतड्यांवर आलेली सूजन कमी करण्याचे काम करतात. तसेच बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो. एकंदरीतच पाचनशक्ती सुधारण्याचे काम वांगी करतात. 

हृदय ठणठणीत ठेवण्यासाठी मदत - 
वांग्यांमध्ये असणारे अँथोसायनिनमुळे हृदयाचे कार्य चांगल्याप्रकारे पार पडण्यास मदत होते. तसेच घाणरेडे कोलेस्ट्रॉल कमी करून 'एचडीएल कोलेस्ट्रॉल' कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
वांग्यांमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही डायट प्लॅन घेतला असेल तर त्यामध्येही वांग्यांचा समावेश असतो. तसेच वांग्यांमध्ये असणारे सॅपोनिन हे शरीरात जमणाऱ्या फॅट्सविरो करून तुमचे शरीर सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करतात.

हिमोग्लोबीन वाढण्यास मदत -
अॅनिमियावर उपचार करायचे असेल तर वांग्यांचे सेवन सर्वात गुणकारी मानले जाते. यामध्ये थायमिन, नियासीन, तांबा, फायबर, फोलिक अॅसिड, विटामीन सी, के आणि बी6 असते. याचसोबत पोटॅशिअम, मॅग्नीज सारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

हाडांचं आरोग्य सुधारते -
वांग्यांमध्ये फेनोलिक तत्व असतात. त्यामुळे हाड मजबूत होतात. तसेच यामध्ये लोह आणि कॅल्शिअम देखील असते. त्यामुळे वांग्यांचे सेवन करणे हाडांसाठी लाभदायक ठरते. 

मानसिक आरोग्य राखण्यासाठी -
वांग्यांमध्ये फाइटोन्यट्रिएंट्स आणि पोटॅशिअम असते. त्यामुळे मेंदूला ऑक्सीजनचा पुरवठा होतो की नाही याबाबत माहिती मिळते. यामुळे रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज देखील दूर होतात. रक्ताचं योग्य वहन झाल्यामुळे मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.

कँसरला हरविण्यात उपयुक्त -
अँटीऑक्सिडेंट, अँथोसायनिन हे तत्व वांग्यांमध्ये असतात. त्यामुळे कँसर होण्याचा धोका टळतो. तसेच कँसर पेशींचा विकास होण्यापासून रोखण्यात हे तत्व महत्वपूर्ण भूमिका बजावतात. यासोबतच सोलासोडाइन रग्मोसिल ग्लाइकोसाइड्स हे तत्व वांग्यांच्या बाह्य आवरणामध्ये असतात. त्यामुळे कँसरच्या पेशी समूळ नष्ट करण्यास मदत होते. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांचा गौप्यस्फोट: जिल्हा बँक अडचणीत आणणारेच निवडणुकीच्या मैदानात

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

Kolhapur : सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागरांना डिवचलं, 'त्या' शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जातात का?

Wimbledon 2025: अल्काराझचे सातत्य की सिनिरचे उलटवार? आज रंगणार फायनल

SCROLL FOR NEXT