winter morning exercise
winter morning exercise esakal
health-fitness-wellness

थंडीत आरोग्यासाठी करा ४५ मिनिटांची गुंतवणूक; सोबत 'या' गोष्टी टाळा

तुषार महाले

नाशिक : हिवाळा (Winter) सुरू झाल्यानंतर थंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यासाठी रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करणे आवश्यक असून, तरूणांनी प्रोटिन पावडरच्या (Protein powder) आहारी न जाता तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रोटिन सेवन करावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

या समस्या हिवाळ्यात प्रामुख्याने उद्भवतात

आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये व खाण्यामध्ये रोजच्या रोज साधायला हवा. हिवाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या दिसून येतात. यात त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटू शकते. याशिवाय ओठही कोरडे पडतात. अशावेळी खोबरेल तेल, तिळाच्या तेलाचा वापर करायला हवा. संसर्गजन्य आजारांची लागण होण्यापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. यासाठी Vitamin D असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. हिवाळ्यात अधिक प्रमाणात फळ आणि भाज्यांचा वापर वाढवावा.

हिवाळ्यात दमा, सर्दी, फ्लू, सांधेदुखी, खोकला आणि घसा दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या, हळद- दूध, पाणी घ्यावे. नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खावे. हिवाळ्यात मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी शरीरासाठी किमान सहा ते आठ तासांची झोप आवश्यक असून, दुपारची झोप टाळावी.

''वजन वाढविण्यासह वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात पोषक वातावरण असते. तापमान सहन करण्याची क्षमता शरीरामध्ये जास्त असल्यामुळे थंडीत श्वसनासंबंधित आजाराचा होण्याचा संभव असतो. घशाला त्रास देतील, असे पदार्थ टाळून योग्य त्या पालेभाज्या, फळांचा आहारात समावेश करावा. वजन वाढविताना योग्य आहार तर वजन कमी करताना गोळ्या खाण्याने वजन कमी होणार नाही. त्यासाठी योग्य आहाराची गरज आहे. स्निग्ध पदार्थांचे सेवन करताना थंड पेय टाळावे.'' - डॉ. प्रतिभा औंधकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT