Birth control pills Birth control pills
health-fitness-wellness

गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करताय? सावधान... होऊ शकतो हा आजार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर सर्वाधिक आढळून येणारा कर्करोग हा गर्भाशय मुखाचा (सर्वायकल कॅन्सर) आहे. लैंगिक संबंधांद्वारे पसरणारा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा ९० टक्के गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. दीर्घकाळापर्यंत गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यानेही हा रोग जडू शकतो. मात्र, लसीकरण, सुरक्षित लैंगिक संबंध आणि योग्यवेळी केलेल्या तपासणीमुळे त्यावर पूर्णतः: प्रतिबंध करता येतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

सप्टेंबर महिना जगभरात महिला कर्करोग जनजागृतीसाठी जगभरात साजरा केला जातो. महिलांना होणाऱ्या कर्करोगामध्ये ३० टक्के प्रमाण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे असून, त्यासंबंधी जनजागृती असल्यास निश्‍चितच टाळता येऊ शकतो. गर्भाशय मुख कर्करोगास कारणीभूत ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा असुरक्षित लैंगिक संबंधांद्वारे पसरतो. त्याचे १५० प्रकार आहेत. यापैकी १५ प्रकारचे विषाणू कर्करोगास कारणीभूत ठरतात. त्यापैकीही ७० टक्के कर्करोग हे टाइप १६, १८, ३१ विषाणूंद्वारे होत असल्याचे आढळले आहे.

धूम्रपान, दीर्घकाळापर्यंत गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, अधिक मुलांना जन्म देणे, कमी वयात लैंगिक संबंध व लग्न या सामाजिक बाबी देखील कारणीभूत आहेत. ५ ते ९ वर्ष गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर केला तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका सामान्यांपेक्षा तीन पटीने तर १० वर्षांहून अधिक वापर केला तर चार पटीने वाढतो. याशिवाय परिवारात कुणाला कर्करोग झाल्यास देखील कर्करोगाची जोखीम वाढते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पंचविशीनंतर करा पॅप स्मीर चाचणी

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी आहे. ही एचपीव्ही लस ९ ते २६ वयोगटात दिली जाते. पहिल्या लैंगिक संबंधांपूर्वी लस घेतली पाहिजे. याशिवाय एकाहून जास्त जोडीदारांशी लैंगिक संबंध टाळावा. लैंगिक संबंध हा सुरक्षित असावा, त्यासाठी निरोध वापरणे हितावह आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जोखीम असेल तर ‘पॅप स्मीर' ही चाचणी करून प्रि-कॅन्सर म्हणजे कर्करोगपूर्व बदल तपासता येतात. वयाच्या पंचविशीनंतर ही चाचणी करता येते. सामान्यतः हा कर्करोग टाळण्यासाठी दर पाच वर्षातून एकदा ही चाचणी केलेली हितावह ठरते. सोबतच एचपीव्ही चाचणी देखील करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूतील कारखान्यात गॅस गळतीमुळे मृत्यू झालेले पाचही जण ओडिशामधील; मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

SCROLL FOR NEXT