health-fitness-wellness

Fact Check : कोंबडीमुळे म्युकोरमायकोसिसचा प्रसार?

खरंच कोंबडीमुळे होतोय का म्युकोरमायकोसिसचा प्रादुर्भाव?

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोना (coronavirus) व त्यासंबंधित आजारांविषयीच्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. सोशल मीडियावर अनेक मेसेज, व्हिडीओच्या माध्यमातून कोरोनाविषयी काही दावेदेखील करण्यात आले आहेत. यात काही दावे सत्य आहेत. तर, काही असत्य. त्यातच आता कोरोनानंतर म्युकोरमायकोसिस म्हणजेच ब्लॅग फंगसविषयी (black fungus) सोशल नेटवर्किंगवर चर्चा रंगू लागली आहे. हा आजार कोंबड्यांमुळे होत असल्याचा दावा एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे. याविषयी पीआयबीने (PIB) फॅक्ट चेक केलं असून सत्य परिस्थिती समोर आणली आहे. (black-fungus-black-fungus-infection-black-fungus-cases-black-fungus-cases-poultry-farm)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात पोल्ट्री फॉर्मवर असलेल्या कोंबड्यांमुळे म्युकोरमायकोसिसचा प्रसार होत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हा दावा खोटा असून म्युकोरमायकोसिस कोंबड्यांमुळे पसरत नसल्याचं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.

"म्युकोरमायकोसिस कोंबड्यांमुळे पसरतो याविषयी कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा खोटा आहे. कोंबड्यांमुळे या आजाराचा प्रसार होत नाही", असं पीआयाबीने स्पष्ट केलं आहे.

म्युकोरमायकोसिस नेमका कसा पसरतो?

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना म्युकोरमायकोसिस होण्याची भीती आहे. ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असणे, मधुमेह, हृदयाशी निगडीत समस्या असलेल्या व्यक्तींना म्युकोरमायकोसिस लवकर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Pandit: पुण्यातील यूट्युबर संतोष पंडित यांना अटक, पोलिसांची कारवाई; स्वतःलाच मारहाण अन् शिवीगाळ... मध्यरात्री घडला थरार

Pune Airport: ३५० रुपयांचे भाडे थेट ६५० वर; पुणे विमानतळावरील टॅक्सी शुल्कावर राजू शेट्टी आक्रमक

ढिंग टांग : फ्लॉवर नहीं, फायर है..!

Abhinandan Varthaman : माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान पुन्हा चर्चेत!पाकिस्तानविरोधातील शौर्यानंतर आता व्यावसायिक विमानसेवेत एन्ट्री

Maval Industrial Area: मावळमध्ये उद्योगांची मोठी झेप! ३६६ हेक्टरवर नवे औद्योगिक क्षेत्र, हजारोंना मिळणार रोजगार

SCROLL FOR NEXT