health-fitness-wellness

थंडीच्या दिवसांत गरम पाणी पिण्याचे फायदे; वजनही होईल कमी

थंडीच्या दिवसांत गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गरमीच्या दिवसांत शरीराला हायड्रेड ठेवणे आवश्यक असते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, थंडीच्या दिससांतही कमी पाणी पिल्याने शरीर डिहायड्रेड होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही गरम पाणी पिऊन शरीराचे डिहायड्रेशन होण्यापासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत.

पचनक्रीया सुधारते -

एका संशोधनानुसार गरम पाणी पिल्याने शरीरातील मेटाबॉलिक रेट सुधारतो. थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाणी शरीराला फायद्याचे असते. यामुळे कफ, खोकला अशा आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. मात्र पाणी न पिल्यास आजारांना आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता असते.

रक्ताभिसरण सुधारते -

थंडीच्या दिवसांत रक्ताभिसरण प्रक्रिया अधिक जलद असते. अनेकांना या दिवसांत रक्तवाहिन्या अखडण्याचा त्रासही उद्भवतो. अशावेळी गरम पाणी यावर चांगला परिणाम करते. ज्यामुळे सर्क्युलेशन सुधारते. यावर अनेक संशोधनही समोर आली आहेत.

वजन कमी होते -

थंडीच्या दिवसांत मेटाबॉलिज्म रेट कमी झाल्याने वजन वाढते. गरम पाणी पिल्याने मेटाबॉलिज्म सिस्टीम जलद होऊन शरीरातील फॅट कमी करते, असा अनेक तज्ज्ञांचा दावा आहे. परिणामी यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी गरम पाणी पिणे फायद्याचे ठरु शकते.

अवयवांच्या वेदनांपासून मुक्तता -

थंडीच्या दिवसांत अनेकांना मांसपेशींच्या वेदनांचा त्रास असतो. तापमान कमी झाले की अनेकांना संधीवादाचा त्रास जाणवतो. हाडे दुखण्यासारख्या समस्या वाढू शकतात. अशावेळी गरम पाणी पिल्याने फक्त मांसपेशी दुखण्यापासून आणि डोकेदुखीपासून मुक्तता मिळू शकते.

नाक आणि गळ्याची समस्या

थंडीच्या दिवसांत चहासारख्या गरमागरम पदार्थांमुळे काही आजार दूर होतात. नाक वाहत असेल किंवा घशात गवगव होत असेल तर अशावेळी गरम पाणी पिणे फायद्याचे ठरते. गरम पाण्यामुळे छाती आणि नाकाच्या समस्या कमी होतात. कारण गरम पाण्यामध्ये बॅक्टेरिया पासून लढण्याची क्षमता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT