parenting-and-bonding-breastfeeding 
health-fitness-wellness

कोरोना व स्तनपान, समज-गैरसमज

डॉ.मीना देशमुख कार्यकारी सदस्य बालरोग तज्ञ संघटना,डॉ.अलका जोगेवार, अकॅडेमि ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूर

जगभरात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सद्यस्थितीत कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सर्व स्तनपान करणाऱ्या मातांना हा प्रश्न नक्कीच भेडसावत असेल की, त्यांनी स्तनपान करावे किंवा कसे ?

कोरोनाचे संशयित किंवा कोरोनाग्रस्त असलेल्या मातांना स्तनपान हे सुरुच ठेवण्यास आपण प्रोत्साहित केले पाहिजे. कारण स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे हे बाळ कोरोना संक्रमित होण्याच्या जोखमीपेक्षा केव्हाही जास्त आहेत. याशिवाय बाळ व माता एकत्र राहिल्यामुळे होणाऱ्या कांगारू केअरचे फायदे व दोघांमध्ये निर्माण होणारे भावनिक बंधन हे जास्त महत्त्वाचे आहे.

सध्याच्या परिस्थितीत स्तनपान करताना आईने कोरोना संदर्भातील सर्वप्रकारच्या दक्षता जसे की, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क परिधान करणे तसेच स्तनपानादरम्यान स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे. या परिस्थितीत स्तनपान करताना मातेला तिच्या कुटुंबाचा व आरोग्य सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचा पुरेसा भौतिक तसेच भावनिक आधार असणे गरजेचे आहे.

सद्यःस्थितीत स्तनपानाव्दारे कोरोनाचा प्रसार होतो किंवा कसे याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यासाठी परिपूर्ण माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नवजात शिशूंना कोरोनाचे संशयित किंवा कोरोना ग्रस्त असलेल्या मातांनी कोरोना संदर्भातली योग्य काळजी घेऊन स्तनपान सुरू ठेवण्याबाबत WHO तसेच इतर संबंधित संस्थांनी सुचविले आहे.

ह्यूमन मिल्क बँक
आशियातील पहिली मिल्क बँक सन १९८९ मधे सायन हॉस्पिटल मुंबई इथे स्थापन झाली. आतापर्यंत ७५ ते ८० मिल्क बैंक इंडियामध्ये आहेत. विदर्भात अमरावतीला पहिली ह्यूमन मिल्क बँक सुरु झाली.
नवजात बालकांसाठी मातेचे दूध हा सर्वांत चांगला आहार असतो. मात्र, अनेकदा गर्भारपणाचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर जन्मलेल्या बाळांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यामुळे त्यांना आईचे दूध मिळणे शक्य नसते. कित्येकदा मातेला पुरेसे दूध नसल्यानेही अर्भकांना बाहेरचे दूध दयावे लागते. मात्र, इतक्या कमी वयाच्या मुलांना बेबी फूड किंवा अगदी गाईचे दूध देणेही धोकादायक असते. त्यातून भविष्यात या मुलांना दमा, कँसर किंवा मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. योग्यवेळी दूध न मिळाल्याने नवजात अर्भकांचे मृत्यू होण्यासारखे प्रकार घडत असतात.

अशा बालकांना वेळेवर दूध 'मिल्क बँक' मधुन मिळते. प्रसूतीनंतर मातेला सुमारे ६०० मिली दूध असते. आपल्या बाळाला पाजल्यानंतर ती १०० ते १५० मिली दृध अशा बँकेसाठी देऊ शकते. ब्रेस्ट पंपच्या साहाय्याने हे दुध काढता येते. पाश्चराईज केलेले हे दूध शीतकरण यंत्रामार्फत सहा महिन्यांपर्यंत साठविता येणे शक्य आहे. अर्भकांना दूध द्यावयाचे असल्यास या दुधाचे तापमान वाढवून देता येते. अलीकडच्या काळात मातांना दूध कमी असणे, मुलांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. ज्या मातांना हृदयरोग, क्षयरोग किंवा एचआयव्हीसारखे रोग आहे, अशा मातांच्या बाळांना या मिल्क बँकेचा मोठा उपयोग होऊ शकतो. यामुळे, रेशा आहाराअभावी होणारे अर्भकांचे मृत्यू टाळता येतात.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Pune News : राज्यातील ‘या’ चार विद्यापीठांच्या अधिनियमांत सुधारणेसाठी समिती स्थापन

Pravin Darekar: 'या' महिलांना महापालिकेची कामे द्यावीत, प्रविण दरेकर यांची मागणी

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

SCROLL FOR NEXT