Latest Marathi News Live Update
esakal
राज ठाकरे आज मुंबईतील गटाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत यासाठी गोरेगावमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात जेसीबी, आयशर आणि कार यांच्यात झाला. लातूरहून देवगुरे कुटुंब चंद्रपूरला मुलगी पाहण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. अपघातात सॉफ्टवेअर अभियंता आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान तातडीने वितरीत करण्याचे आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार, ५४ हजार हेक्टर क्षेत्रातील ८६ हजार लाभार्थ्यांसाठी ४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, पुढील तीन दिवसांत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
पंढरपुरात ऐन दिवाळीत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू केली आहे. या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. तब्बल 14 लाख रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. एका टेम्पो मधून 30 पोती सुगंधी तंबाखू नेली जात होती. पोलिसांना याची माहिती मिळताच छापा टाकून कारवाई केली. अन्न व औषध नियमाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडल्याची घटना घडलीय. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दिवाळीत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातलं हवामान संमिश्र राहण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस नसला तरी मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. दीपावलीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही पुजा आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर ,श्रीनिवास जोशी यांनी बांधली. धन्वंतरी रूपातील अंबाबाई देवीची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.