feet e sakal
health-fitness-wellness

पायांची आग होतेय? अशी घ्या काळजी

काही घरगुती उपयांमुळे तुम्हाला आराम मिळू शकतो

सकाळ डिजिटल टीम

सध्या ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण त्रस्त आहेत. प्रचंड उकडत आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे लोकांच्या पोटावरही परिणाम झाला आहे. तर काहीजणांच्या पायाच्या तळव्याची आग होतेय. त्यामुळे त्यांचा वैताग आणखी वाढला आहे. मात्र काही घरगुती उपयांनी ही आग, जळजळ तुम्ही कमी करू शकता. असे केल्याने तुमच्या पायांना आराम मिळेल. असे आहेत घरगुती उपाय.

हळद लावणे उत्तमच - हळद लावूनही जळजळ कमी करता येऊ शकते. एक चमचा हळदीची पेस्ट करून ती तळव्यावर पाच मिनिटे लावून ठेवायची. नंतर स्वच्छ धुवायची. हळदीमध्ये असलेल्या दाहक विरोघी गुणधर्मामुळे जळजळीपासून आराम मिळेल.

पायावर मेहंदी लावा- मेहंदी लावून गारवा मिळतो. म्हणून मेहंदी लावणे अधिक चांगलेय कलर नसलेली मेहंदी पावडर काही काळ पाण्यात भिजवून ती पायाला लावून ठेवायची. मेहंदी सुकल्यानंतर ती धुवायची. यामुळे पायांना थंड वाटून जळजळ कमी होईल.

रॉक सॉल्टचाही फायदा

पायाची जळडळ कमी करण्यासाठी रॉक सॉल्टचा वापर करता येईल. कोमट पाणी टबात घ्यायचे. त्यात रॉक सोल्ट धालायचे. त्या पाण्यात पाय ठेवून 10 ते 15 मिनिटं बसायचे. असे केल्याने कोणताही त्रास न होता जळजळ कमी होऊन पायाला आराम मिळेल.

Apple Cider Vinegar चा पर्याय- Apple Cider Vinegar लावल्याने पायांची जळजळ कमी होऊ शकते. यासाठी एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे हे व्हिनेगर टाकायचे. त्यात आपले पाय बुडवून ठेवायचे. असे केल्यानेही पायाला जळजळीपासून आराम मिळेल.

करडईची पानेही उपयुक्त- पायाची जळजळ कमी करण्यासाठी करडईची पानेही उपयोगी पडतात. ही पाने चांगली धुवून त्याची थोडीशी घट्ट पेस्ट तयार करायची.ती पेस्ट पाय आणि तळव्यावर लावून 10 मिनिटे ठेवायची. नंतर पाय धुवायचे. असे दिवसातून दोनदा केल्याने पायाला लवकर आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT