Care of teeth should be maintained 
health-fitness-wellness

Dentist Day : दातवाल्या माणसांनी हे केलंच पाहिजे..

डॉ. सुमित नलवडे

नगर ः दात नियमित स्वच्छ न केल्यास फक्त दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे याच समस्या निर्माण होत नाहीत तर Oral Cancer सारख्या भयानक आजारालादेखील सामोरे जावे लागू शकतं. नियमित दातांची निगा न राखल्यामुळे दातदुखी, तोंड येणे, दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे यांच्या समस्या निर्माण होतात. मात्र, एवढंच नाही तर हे तोंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असू शकते.  ‘तोंडाचा कर्करोग हा जबडयाच्या आतल्या बाजुला असलेली त्वचा स्नायू, नसा, हिरड्यांमध्ये होण्याची शक्यता असते. ओरल कॅन्सरवर उपचार असले तरी दुर्देवाने निष्काळजीपणा व अयोग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत अनेकांचा यात मृत्यु झाला आहे.’

ही आहेत बरं का कारणं...

सामान्यत: तोंडामधील कर्करोग हा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त आढळतो पण काहीवेळा तरुणांमध्येही या रोगाची लक्षणे दिसुन आलेली आहेत. ‘धुम्रपान,मद्यपान,तंबाखु व सुपारीचे अतिसेवन, ओठांचा सतत सुर्यप्रकाशाशी सबंध आल्याने हा आजार अधिक बळावतो. तसेच तोंडातील अस्वच्छतेमुळेही तोंडातील कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.  त्यासोबतच जर पूर्वी कधी तुम्हाला डोक्याचा किंवा मानेचा कर्करोग झाला असेल, वारंवार तोंडातील इन्फेक्शन होत असेल किंवा मग घरातील कोणाला याचा त्रास असेल तर त्यांना हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. 

तोंडाच्या कर्करोगामुळे जबडयाच्या आतील भागात अनेक समस्या निर्माण होतात. या आजाराच्या उपचारादरम्यान हिरडयांचे आजार, दात किडणे असे अनेक त्रास उद्धभवू शकतात. या आजारामुळे तोंडातील लाळ निर्माण करणार्या ग्रंथींना इजा होते ज्यांच्यामुळे खरंतर तोंडाच्या आतील भागाचे इनफेक्शनपासून संरक्षण होत असते.

ओरल कॅन्सरची ही आहेत लक्षणं

ओरल कॅन्सरसाठी कितीही गोष्टी कारणीभूत असल्या तरी तोंडांतील अस्वच्छतेमुळेच तो होतो हे मात्र नक्की.
सुरुवातीच्या काळात तोंडातील आतल्या त्वचेवर फोड येतात किंवा गाठ येते.
दात सैल होतात, दातांचे व हिरडयांचे खुप नुकसान होते. दात जबडयापासून सैल होऊ लागतात.
अन्नपदार्थ चावण्यास त्रास होतो. घास गिळताना वेदना होतात.
कर्करोगाच्या या गाठीमुळे गिळता न आल्यामुळे पुरेसे अन्न खाल्ले जात नाही व त्यामुळे कुपोषण होते.

हे होत असेल तर भयानकच..

दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस तोंडामध्ये फोड येतात किंवा घसा दुखतो. तोंड किंवा मानेवर गाठ येते. घास चावण्यास व गिळण्यास त्रास होतो. गालाची जाडी वाढते. जबडा किंवा चेहरा बधीर होतो. खुप दिवस आवाज घोगरा असतो.
तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे पडतात. जबडा किंवा जीभेची हालचाल करणे कठीण होते. कवळी नीट  बसत नाही. दात सैल होतात. बोलताना त्रास होतो. तोंडावाटे किंवा ओठातून रक्त येते. तोंडात गाठीप्रमाणे छोटे फोड येतात. अशी कोणतीही लक्षणे आढल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टर किंवा डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा. घाबरु नका कारण प्रत्येक वेळी ही लक्षणे आढळल्यास कॅन्सर असेलच असे नाही पण ही कर्करोगाची लक्षणे आहेत,  तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

असा कराल बचाव

काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला या  आजारापासून दूर ठेऊ शकतात. त्यासाठी या गोष्टींचे जरुर पालन करा. धुम्रपान व तंबाखुचे सेवन टाळा, धुम्रपान व तंबाखुच्या सेवन हानिकारक आहे. कारण सिगार, तंबाखू, सिगारेट,पाईप या गोष्टी कर्करोगाला आमत्रंण देतात. दारुमुळे कर्करोगाचा धोका अधिक निर्माण होतो.या गोष्टींचे अतिसेवन करणा-यांना कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. धुम्रपान व मद्यपानापासून दूर रहा.

जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहाणे टाळा
सूर्यप्रकाशांमुळे ओठांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. जो खालच्या ओठाला मोठ्या प्रमाणात झालेला आढळून येतो. या पासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन व लीपबाम वापरा.

समतोल आहार घ्या

सकस व समतोल आहारदेखील तुम्हाला तोंडाच्या कर्करोग या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतो. नियमित तपासणी करा, जीभ बाहेर काढा व सर्व बाजूने नीट तपासा.घशामध्ये आवाजात काही बदल जाणवतात का ते बघा.जर जबडयात किंवा मानेत कोणतीही गाठ आढल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डेटिस्टकडे नियमित जा

जरी तुम्ही स्वत:ची नियमित तपासणी करीत असाल तरीदेखील कधी कधी तोंडामधील डाग व फोड लहान असल्याने तुम्हाला समजण्यास कठीण जाऊ शकतात तेव्हा त्यासाठी नियमित दंतवैद्याचा सल्ला घ्या.

लहान मुलांचे दात काढल्यानंतर काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही स्वत:ची नियमित तपासणी करत असाल तरी देखील कधी कधी तोंडामधील डाग व फोड लहान असल्याने तुम्हाला समजण्यास कठीण जाऊ शकतात. तेव्हा त्यासाठी नियमित दंतवैद्याचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान झाले तर तोंडातील कर्करोग पुर्ण बरा करता येऊ शकतो. जर तुम्ही धुम्रपान किंवा मद्यपानासारख्या वाईट सवयींचे बळी पडला असाल तर या लक्षणांना अजिबात दुर्लक्ष करू नये.

 डॉ.सुमित नलवडे, अहदमनगर (BDS MDS)

९९२१६१५५५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

SCROLL FOR NEXT