कोल्हापूर : आपल्या दैनंदिन आहारातील एखादा पदार्थ एक दोन नव्हे तर अनेक व्हिटॅमिन आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व देणारा ठरतो आणि यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे गाजर होय .गाजर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील आहारातील एक अविभाज्य घटक आहे. स्वादिष्ट, रुचकर असे हे गाजर आपण कच्चे खाऊ शकतो, त्यापासून सूप बनवू शकतो, ज्यूस बनू शकतो. याशिवाय त्यापासून बनवला जाणारा हलवा हा अत्यंत चविष्ट आणि अप्रतिम ठरतो. या गाजराचा वापर सर्वच देशात जेवणाच्या वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जातो. गाजराचा उपयोग तोंडाची चव वाढवण्या बरोबरोच पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी होतो. नेमका काय उपयोग होतो ते जाणून घेऊया.
असे मिळतात प्रथिने
गाजर हे फक्त चवीला नव्हे तर शरीरासाठीही अत्यंत आवश्यक असे घटक पुरवतो. यामध्ये फ़ाइबर, पोटॅशियम, विटामिन ए, बी1, बी2, बी3, ई, के, मॅगनीज़, बायोटिन, फ़ॉस्फोरस, फ़ॉलेट, आयरन अनेक प्रकारचे ऐंटी-ऑक्सिडेंट्स गाजरामध्ये असतात. यातून कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे गाजर अत्यंत उपयुक्त ठरत असते.आपल्या आहारामध्ये पचन व्यवस्था चांगली राहण्यासाठी फायबर युक्त पदार्थांची अत्यंत गरज असते आणि हे फायबर या गाजर मधून अत्यंत मुबलक प्रमाणात मिळत असते. याचबरोबर गाजरामध्ये कैरोटिनॉयड आणि डायटरी फ़ाइबर जसे बायोऐक्टिव कंपाउंड हे सुद्धा भरपूर असतात. शरीर डीटॉक्स करण्याचे काम गाजर करत असते. तर कैरोटिनॉयड हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात. गाजरामुळे मुळे शरीरात तयार होणाऱ्या गाठी , मूळव्याधीचा त्रास यापासून आपणास मुक्तता मिळते.
आपल्या आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढण्या बरोबरच आपले हाडे ही गाजरामुळे मजबूत होत असतात.
हृदयासाठी उपयुक्त गाजर
गाजरामध्ये मध्ये असणारे पोटॅशियम हे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्याचबरोबर शरीरातील आयर्न चे प्रमाण कमी होऊ नये यासाठी गाजर मधील अनेक घटक महत्त्वपूर्ण ठरतात. व्हिटॅमिन इ भरपूर असल्याने गाजरामुळे शरीरात नवीन रक्त तयार होण्यासाठी चांगली मदत होते. गाजरामध्ये असणारे बीटा-कैरोटिनॉयड हे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणारे रक्तस्राव कमी करण्यासाठी ही मदत करत असते तसेच मोतीबिंदू होऊ नये यासाठीही यातील घटक आवश्यक ठरतात. गाजरामध्ये असलेले विटामिन हे ए आपले डोळे अधिक निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
हृदयाचे काम चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी गाजर मधील अनेक घटक उपयुक्त ठरतात. यातील बीटा-कैरोटिनॉयड, अल्फ़ा-कैरोटीन आणि लुटेइन सारखे ऐंटी-ऑक्सिडेंट्स महत्त्वपूर्ण ठरतात जे कोलेस्ट्रॉलचे चे प्रमाण वाढू देत नाहीत. यामुळे हार्टअटॅक सारख्या आजाराची शक्यता कमी होते. हृदयाचे आजार किंवा रक्तदाब वाढल्यास गाजर किसून खाल्ल्यानंतर त्याचा चांगला फायदा होतो.
गर्भवती महिलांना होतात हे फायदे
गाजरामध्ये असणारे फोलेट हे गर्भवती महिलांच्या साठी अत्यंत उपयुक्त असे पोषक ठरतात. गर्भावस्थेच्या वेळी फ़ॉलेट ची आवश्यकता असते फ़ॉलेट कमी झाल्यास त्याचा परिणाम गर्भात असणाऱ्या अर्भकाच्या बुद्धीच्या विकासावर होतो. गाजरा मधील ऐंटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्स चा प्रभाव कमी करण्यासाठी त्याच बरोबर अँटी एजिंग प्रॉपर्टी प्रमाणे काम करत असतात गाजर हे वर्धक पदार्थ आहे.
अति वापराने हे होतात दुष्परिणाम
मोठ्या प्रमाणात सेवन केल्यानंतर त्याचा परिणाम ऍसिडिटी किंवा त्याच्याशी संबंधित अन्य समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे याचा वापर नियंत्रणामध्ये करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी गाजराचा अधिक वापर अनेक वेळा हानीकारक ठरतो. त्यामुळे याचा वापर प्रमाणशीर रोज करणे आवश्यक आहे. देशात सर्वत्र मिळणारा आणि माफक दरात मिळणारे गाजर आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे त्याचे नियमित आहारात वापर करून आपले आरोग्य संपन्न करूया.
असे बनवा गाजर ज्यूस
गाजरा पासून ज्यूस कशा प्रकारे बनवला जातो याची आपण माहिती घेऊया या साठी लागणारे पदार्थ
दोन गाजर
एक आवळा
अर्धा टोमॅटो
थोडीशी धन्याची पुड
एक चिमट काळी मिरची पावडर
शेंदा मीठ
तयार करण्याची पद्धत
गाजर चांगल्या पद्धतीने धुऊन घेऊन त्याचे तुकडे करा त्यानंतर वरील सर्व पदार्थ ग्राइंडर मध्ये घाला त्यामध्ये एक ग्लास पाणी ओता चांगल्या पद्धतीने याचे मिश्रण तयार झाल्यानंतर ते गाळून घ्या. फक्त ज्यूस बनवू शकता.
डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.