rain health tips 
health-fitness-wellness

बदलत्या वातावरणाचा होतोय आरोग्यावर परिणाम, काळजी घ्या

सकाळ वृत्तसेवा

उन्हाने अंगाची लाही होतानाच आकाशात ढगांनी गर्दी केली. अचानक पावसाच्या धारा बरसु लागल्या. अशा हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे ठरते. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणून वापरातील सर्व पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. पाण्याच्या शुद्धतेसोबत अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये यासाठी स्वच्छता ठेवणे हाच सर्वात मुख्य प्रतिबंधक उपाय आहे.

पावसाळ्यातील काळजी

  • आपले घर, परिसर स्वच्छ ठेवा. घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवा.
  • भांडी, कपडे ओलसर ठेवू नका. स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ व निर्जंतुक साबणाने स्वच्छ करून घ्यावी. 
  • लहान मुलांची खेळणी आठवड्यातून एकदा निर्जुंतक पाण्यातून विसळून घ्यावीत.
  • पावसाळ्यातील हे आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिणे आवश्‍यक आहे.
  • घराच्या भोवती कुंड्या लावल्या असतील तर पावसापूर्वी त्याची छाटणी करावी, घरामध्ये झाडे लावू नयेत. यात पाणी साठून डासांची पैदास वाढते.
  • जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावरील अन्न पदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खाऊ नये.
  • कोणतेही इन्फेक्‍शन होऊ नये म्हणून मास्क वापरावा.
  • वयस्कर व्यक्तींनी उबदार कपडे वापरावेत. कानटोपी घालावी.
  • तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.

पावसाळ्यातील आजाराची लक्षणे

  • सतत उलट्या, जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, गळून गेल्यासारखे होणे
  • स्त्रियांमध्ये हात-पाय खूप दुखणे
  • मुलांमध्ये पोट दुखण्याचा त्रास जाणवत

वातावरणात बदलामुळे सर्दी, ताप, खोकला हे सिझनल आजार होण्याची शक्‍यता असते. या आजाराचे विषाणू हवेव्दारे पसरत असल्याने मास्क वापरणे फायदेशीर ठरेल. ताजे व हलका आहार घेण्यास भर द्यावा.
- डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधिकारी, सेवारूग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''माझ्या संमतीशिवाय तिने मला किस केलं'', 'त्या' प्रकरणात प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचे सहकारी महिलेवर गंभीर आरोप, जीव देण्याचाही प्रयत्न...

Maruti Suzuki Price Hike: ऑगस्टपासून मारुती सुझुकीच्या गाड्या महाग होणार! वर्षात दुसरी दरवाढ; कारण काय? किंमतीत किती वाढ होणार, पाहा

Live Updates Marathi : फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

Mumbai Local: दिव्यांगांच्या लोकल डब्यांत घुसखोरी, वर्षभरात २३ हजार प्रवाशांकडून २४ लाखांचा दंड वसूल

Jalgaon News : सायबर गुन्हेगारांची आता खैर नाही; गृहमंत्री अमित शहा घेणार थेट जिल्हापातळीवर आढावा

SCROLL FOR NEXT