चेतना तरंग : प्रश्न आणि इच्छांवर नियंत्रण sakal
health-fitness-wellness

चेतना तरंग : प्रश्न आणि इच्छांवर नियंत्रण

इच्छा त्यांच्या स्वतःच्या मनानेच येत असतात, नाही का? त्या तुमची परवानगी घेऊन येतात का कधी? त्या आल्या की तुम्ही त्यांचे काय कराल?

श्री श्री रविशंकर

सत्संगामध्ये एका युवकाने एक प्रश्न विचारला आणि ‘श्री श्रीं’नी त्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वीच त्याने पुढला प्रश्न विचारला. यावर ‘श्री श्री’ म्हणाले, ‘‘तू जर प्रश्नालाच धरून बसलास, तर तू उत्तर कसे घेशील? तुझा प्रश्न मला देऊन टाक आणि मग तुझ्या लक्षात येईल की तू आधीच उत्तरामध्ये आहेस.’’

इच्छा त्यांच्या स्वतःच्या मनानेच येत असतात, नाही का? त्या तुमची परवानगी घेऊन येतात का कधी? त्या आल्या की तुम्ही त्यांचे काय कराल? आणि तुम्हाला त्या येणंच नको असेल, तर ही एक नवी इच्छाच झाली ना? तुम्हाला मी या कोड्यासाठी एक धागा देतो.

तुम्हाला कधी विमानाने प्रवास करायचे असेल किंवा सिनेमाघरात सिनेमा पाहायचा असेल, तर तिकीट काढावे लागते. हे तिकीट विमानात किंवा सिनेमाघरात प्रवेश करण्यापूर्वी तेथील पर्यवेक्षकाच्या हातात सोपवावे लागते, तरच तुम्हाला विमानात किंवा सिनेमागृहात प्रवेश मिळतो. पण तुम्ही ते तिकीट धरून बसलात, सोडायला तयार नसाल, तर तुम्हाला प्रवेश मिळेल का?

एका कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश हवा असेल, तर आधी प्रवेश अर्ज भरून तो अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर् करावा लागतो. जर अर्ज पकडून बसाल, तर प्रवेश मिळेल? जीवनाच्या प्रवासातसुद्धा इच्छा निर्माण झाल्यावर तिला धरून न ठेवता समर्पित करावे लागेल आणि जितके सहजतेने इच्छांचे समर्पण करीत राहाल, तितक्या इच्छा कमी होऊ लागतील.

इच्छा करीत राहूनही ज्यांच्या इच्छांची पूर्ती नाही होत, ते अभागी आहेत. ज्यांच्या इच्छा थोड्या विलंबाने पूर्ण होतात, ते थोडे भाग्यशाली आहेत.

ज्यांच्या इच्छा निर्माण झाल्यावर लगेच त्यांची पूर्ती होते, ते भाग्यवान आहेत. पण ज्यांच्या मनात कधी इच्छाच येत नाहीत, ते सर्वांत अधिक भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या इच्छा प्रकट होण्यापूर्वीच संपूर्ण तृप्ती आणि पूर्ण समाधान प्राप्त झालेले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT