Coriander Water For Diabetes
Coriander Water For Diabetes 
health-fitness-wellness

High Blood Sugar असलेल्यांना धन्याचे पाणी प्यायल्याने 'असा' होतो फायदा!

सकाळ डिजिटल टीम

Coriander Water For Diabetes: भारतीय जेवणात धने खूप महत्वाचे मानले जातात. कुठलाही मसाला करा त्यासाठी धने लागतातच. कोथिंबीरीपासून ते धन्याच्या दाण्यापर्यंत आपल्याला धन्याचा विविध प्रकारे उपयोग होतो. जेवणाची (Food) चव वाढविण्याबरोबरच धने आरोग्यासाठीही फायद्याचे आहेत. धन्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म तसेच बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध घालणारे घटक असतात. हे घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतात. तसेच त्यामुळे भूक वाढते. पचनही सुधारते. मधुमेहाच्या (Dibites) रूग्णांसाठी धन्याचे पाणी हा उत्तम पर्याय आहे.

Blood Sugar Level

मधुमेहाच्या रूग्णांना कसा फायदा होतो? ( Coriander Water Can Manage Blood Sugar Level)

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी धणे हा पारंपारिक उपायांपैकी एक आहे. धण्याच्या अर्कामध्ये काही संयुगे असतात. ती रक्तात सोडल्यास अँटी-हायपरग्लाइसेमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग आणि इन्सुलिन सारखी क्रिया घडते. त्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. महत्वाचे म्हणजे धणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच धणे इंसुलिनचा स्राव उत्तेजित करून नैसर्गिकपणे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात मदत करते. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने बनवलेले हार्मोन आहे. तेशरीराला साखरेचा वापर करण्याची परवानगी देते. जेव्हा इन्सुलिन खराब होते, तेव्हा तुमचे शरीर किती साखर पचवू शकते हे सांगत नाही. किंवा साखर आवश्यक आहे का ते सांगू शकत नाही, परिणामी रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे धन्याचे पाणी प्यायल्याने यावर योग्य नियंत्रण राहण्यास मदत होते.(D

coriander-seeds

अशाप्रकारे तयार करा पाणी | (How To Prepare Coriander Water)

१) धणे कुटून घ्या.

२) पाण्यात या बिया टाका.

३) रात्रभर भिजवून ठेवा.

४) सकाळी हे पाणी गाळून घ्या. धणे काढून घ्या. सकाळी हे पाणी प्या.

५) तुम्ही दिवसभरही हे पाणी घोटघोटभर पिऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT