health-fitness-wellness

Corona After Effects: ब्लॅक फंगसनंतर रुग्णांमध्ये गँगरीनची समस्या

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची श्रवण क्षमताही क्षीण झाल्याचं दिसून येत आहे.

शर्वरी जोशी

कोरोना विषाणू (corona) म्हणजे एक प्रकारे देशाला लागलेली कीड आहे, असं म्हणावं लागेल. वर्षभरानंतर आता या विषाणूचं संक्रमण कमी होत आहे. मात्र, दुसरीकडे अनेक नवनवीन आजार डोकं वर काढत आहेत. कोरोनावर मात केलेले असंख्य रुग्ण आज म्युकोरमायकोसिस (ब्लॅग फंगस), यलो किंवा व्हाइट फंगस या आजाराने त्रस्त झाले आहेत. त्यातच आता आणखी एक नवी समस्या उद्भवली आहे. कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांना आता गँगरीन (gangren) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर अनेकांची श्रवण क्षमताही क्षीण झाल्याचं दिसून येत आहे. (corona-after-effects-new-disease-gangrene-after-black-fungus-infection-know-what-is-its-treatment)

गँगरीन झाल्यानंतर रुग्णाच्या हातापायाची बोटं काळी पडत असून हळूहळू त्यांच्या संपूर्ण त्वचेचा रंग बदलत आहे. गँगरीन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रुग्णाची त्वचा काळी, गडद लाल आणि जांभळट रंगाची होत आहे. सध्यस्थितीमध्ये पाटणामधील एम्स रुग्णालयात गँगरीनचे ६ रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्या रुग्णांना होतंय गँगरीन?

ज्या रुग्णांची शुगर लेव्हल जास्त होते त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो अशा रुग्णांमध्ये गँगरीन होण्याची शक्यता असते. हे रुग्ण औषधांच्या सहाय्याने कोरोनावर मात करतात. परंतु, त्यांना गँगरीन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये गँगरीनची कोणतीही लक्षण जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, असं एम्स रुग्णालयाचे डीन उमेश कुमार भदानी यांनी सांगितलं.

गँगरीनमध्ये नेमकं काय होतं?

गँगरीन झाल्यानंतर रुग्णाच्या हातापायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे या भागातील रक्तपुरवठा खंडीत होतो. म्हणूनच, रुग्णाच्या हातापायाची बोटं काळी होतात. ही समस्या शस्त्रक्रिया केल्यानंतर दूर होऊ शकते.

गँगरीनची लक्षणे कोणती?

हलका ताप येणे

आळस येणे

हाताच्या बोटांजवळ सूज येणे

सूज आलेल्या ठिकाणची त्वचा काळसर निळी पडणे.

हाताची त्वचा सैल झाल्यासारखी वाटणे.

श्वास घेण्यास अडचण येणे

हृदयाचे ठोके वाढणे

दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा (B.1.617) प्रसार ६० पेक्षा जास्त देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियापासून यू.एस मधील लॉकडाउनच्या कालावधी पुन्हा वाढविण्यावर विचारविमर्श सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

Indian Army : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी पुतीन यांना दिली मानवंदना; निमगाव म्हाळुंगीचा अभिमान!

SMAT 2025: ११ चेंडूंत ५४ धावा! अजिंक्य रहाणे सुसाट... T20तील शतकापासून थोडक्यात वचिंत राहिला; मुंबईला मात्र विजय मिळवून दिला

Latest Marathi News Update: कन्नडमध्ये ६२ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास

SCROLL FOR NEXT