Curd Benefits esakal
health-fitness-wellness

हिवाळ्यात दही खाणं आरोग्यास घातक आहे?

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात दही नुकसान करतं, असा अनेकांचा गैरसमज आहे; पण..

'दही' (Curd) आरोग्यासाठी खूप चांगलंय. हे एक उत्तम प्रोबायोटिक मानलं जातं. प्रोबायोटिक्स (Probiotics) आपल्या अन्ननलिकेत चांगले बॅक्टेरिया (Bacteria) वाढवतात, त्यामुळं आपली पचनक्रिया चांगली राहते. उन्हाळ्यात दही, ताक, लस्सी हे सगळेच जण पितात. परंतु, हिवाळ्यात दही नुकसान करतं, असा अनेकांचा समज असला तरी, त्यामुळं खोकला आणि घसा दुखू शकतो. ज्यांना दही आवडतं आणि जेवणासोबत ते नियमितपणे खातात, त्यांच्यासाठी हिवाळ्यात दही सोडणं कठीण असतं. आयुर्वेद (Ayurveda) याबद्दल कोणता सल्ला देतं आणि विज्ञान (Science) काय सांगतं, हे आपण जाणून घेऊ..

आयुर्वेद काय सांगतं?

हिवाळ्यात आलू पराठा, कचोरी, खिचडी असे अनेक पदार्थ आहेत, जे दही किंवा रायत्याशिवाय अपूर्णच वाटतात. बरेच लोक मानतात की, दही खाल्ल्यानं घसा खवखवणं आणि सर्दी होऊ शकते. आयुर्वेदातही हिवाळ्यात दही न खाण्याचा सल्ला दिला जातो. हे आपल्या शरीरात म्यूकस वाढवतं, असं मानलं जातं. ज्यांना आधीच श्वास आणि खोकल्याशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्या अडचणी वाढू शकतात. म्हणूनच, आयुर्वेदात हिवाळ्यात विशेषतः संध्याकाळी दही खाण्यास मनाई आहे. जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या असेल, तर तुम्ही संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी दही खाऊ शकता.

विज्ञान काय म्हणतं?

विज्ञान म्हणतं, दही हे प्रोबायोटिक आहे, त्यामुळं ते तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी चांगलंय. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणात असतं. हिवाळ्यात आपल्या शरीरात अनेक प्रकारचे संक्रमण लवकर होतात, त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणं देखील आवश्यक आहे. थंड दही न खाणे हाच उत्तम उपाय आहे. तसेच दह्यामुळं घसा खवखवणं, खोकला किंवा सर्दी यांसारख्या समस्या उद्भवल्याचा पूर्वीचा अनुभव असेल तर दही खाऊ नये. काही वेळा दह्याच्या अॅलर्जीमुळं खोकला, घसादुखी अशा तक्रारी होतात.

टीप : या लेखात प्रकाशित केलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. 'ई-सकाळ' याला दुजोरा देत नाही. म्हणून, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

SCROLL FOR NEXT