custard-apple Custard Apple
health-fitness-wellness

सीताफळ कोणी खाऊ नये व का खावे; जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडीज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता येते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये सीताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड ॲपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात.

सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

कोणी खाऊ नये सीताफळ

  • ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये

  • ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये

  • अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते

  • बैठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे

  • सीताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या

  • याने डोळ्यांची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात

सीताफळ खाण्याचे फायदे

  • सीताफळ हे हृदयाचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करते.

  • सीताफळामधील व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते

  • टाइप - २ मधुमेहाचा धोका कमी करू शकतो

  • दररोज एक सीताफळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांना त्रास कमी होतो.

  • कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सीताफळाचे सेवन उपयुक्त ठरेल

  • गरोदरपणात दररोज सीताफळ घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका कमी होतो

  • सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खा

  • स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम

  • शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते

  • हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यास मदत

  • हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ फायदेशीर आहे.

  • नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते

  • शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

  • लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: आम्ही फायनल खेळणार... पाकिस्तानी खेळाडूचा ओव्हरकॉन्फिडन्सच तर पाहा; Viral Video

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते Hanumant Pawar यांना भाजपच्या Tushar Damgude यांच्यासह ३-४ जणांकडून मारहण

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे

Ayurvedic Skincare Tips : महागड्या क्रीम कशाला? रात्री झोपताना लावा फक्त 1 गोष्ट; उन्हात काळवंडलेला चेहरा दुसऱ्याच दिवशी होईल टवटवीत!

Government Scheme: गर्भलिंग निदानाची माहिती द्या एक लाख मिळवा; स्त्रीभ्रूण हत्यांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, काय आहे खबरी योजना?

SCROLL FOR NEXT