Cycling Benefits
Cycling Benefits esakal
health-fitness-wellness

Cycling Benefits : रोज 'इतकी' मिनिटे चालवा सायकल! होतील इतकी फायदे

सकाळ डिजिटल टीम

सायकलिंगबरोबरच सकस आहार घेत राहणे अत्यंत गरजेचे आहे.

अनियमित सुरु असलेला आहार आणि चुकीच्या लाइफस्टाइलमुळे (Lifestyle) अनेक वेळा लोक लठ्ठपणाला बळी पडतात. पोट आणि कंबरेच्या आसपासची चरबी जेवढी वेगाने वाढते, तेवढी ती कमी करणं कठीण जातं. तुम्हालाही वजन आणि चरबी कमी करायची असेल तर ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सायकलिंग करणे हे जिममध्ये तासन्तास घाम गाळून व्यायाम करण्याइतकेच फायदेशीर आहे, कारण सायकलिंगमुळे चयापचय दर वाढतो, स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील चरबी कमी होते.

सायकलिंगमुळे कॅलरी बर्न होतील

एका संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी, आपण व्यायामाद्वारे आठवड्यातून किमान दोन हजार कॅलरी बर्न केल्या पाहिजेत आणि आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्थिर आणि नियमित सायकलिंग केल्यामुळे दर तासाला 300 कॅलरी बर्न होतात. अशा परिस्थितीत तुम्ही जेवढी सायकल चालवता तेवढे तुमच्या कॅलरीज बर्न होतील आणि शरीरातून चरबी कमी होईल, पण त्यासाठी सायकलिंगबरोबरच सकस आहार घेत राहणे अत्यंत गरजेचे आहे.

रूटीनमध्ये अशा प्रकारे करा सायकलिंगचा समावेश, मिळेल जबरदस्त फायदे

- तुम्हाला घरातील सामान घेण्यासाठी बाजारात जावे लागत असेल किंवा ऑफिसला जायचे असेल किंवा शाळेत जायचे असेल तर सायकलचा वापर करा.

- कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करण्यासोबतच सायकलिंग केल्यास अनेक प्रकारचे गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

- सायकल चालवून हृदयाशी संबंधित आजार, स्ट्रोक, मधुमेह, नैराश्य यापासून बचाव करता येतो.

- सायकलिंग हा एक लो-इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे ज्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेऊ शकतात.

- सायकलिंगमुळे नैराश्य, तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याचे आजार कमी होऊ शकतात.

दररोज किती सायकल चालवायला हवी?

सायकल चालविणे ही केवळ एक मजेदार एक्टिव्हिटी नाही, तर आपल्या मसल्स टोन करणे, आपली हाडे मजबूत करणे आणि वजन कमी करणे देखील हा एक चांगला व्यायाम आहे. बऱ्याच अभ्यासांमधून असे दिसून येते की दिवसातून एक तास सायकल चालवल्यास 300 कॅलरी बर्न होऊ शकतात. आरोग्य तज्ञ दररोज 30 ते 60 मिनिटे सायकल चालवण्यासाठी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT