Ardh Katichakrasan
Ardh Katichakrasan  
health-fitness-wellness

Daily योग: पाठदुखीने त्रस्त आहात? अर्ध कटिचक्रासन नक्की करून पहा

सकाळ डिजिटल टीम

पाठदुखीचा त्रास अनेकांना होत असतो. या पाठदुखीची कारणं अनेक असू शकतात. मात्र, यामागे कमकुवत स्नायू आणि लवचिकता कमी असल्याचं महत्त्वाचं कारण आहे. चुकीचे बसणे, दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे, दीर्घकाळ उभे राहणे यामुळेही पाठदुखीचा, कंबर दुखीचा त्रास होतो. सध्या अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत असल्याने हा त्रास अनेकांना जाणवत असणार. अशा वेळी कामातून थोडा वेळ काढून हे आसन केल्यास त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकेल.

अर्ध कटिचक्रासन कसे करावे?

हे आसन करताना शरीराची स्थिती ही अर्ध्या चक्रासारखी होते, म्हणूनच त्याला अर्ध कटिचक्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वांत आधी सरळ सावधान स्थितीत उभे राहा. त्यानंतर उजवा हात सरळ डोक्याच्या वर उचला आणि हळूहळू डावीकडे झुकण्याचा प्रयत्न करा. यावेळी हाताचा कोपरा ताठ आणि हातांची बोटं सरळ ठेवा. गुडघे ताठ ठेवून या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वासोच्छवास करत थोडा वेळ उभे राहा. यानंतर उजवा हात हळूहळू पूर्वस्थितीत आणत खाली करा.

अर्ध कटिचक्रासनाचे फायदे कोणते?

- पाठीचे स्नायू आणि पाठीचा कणा लवचिक होतो.

- फुफ्फुसातील ब्लॉकेज साफ होतात आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होते.

- पार्श्वभागाची लवचिकता वाढवते.

- छातीजवळील स्नायूंना योग्य ताण मिळतो.

- मूत्रपिंडाची कार्ये सुधारण्यास मदत होते.

- अतिरिक्त चरबी कमी करून बांधा सुडौल होण्यास मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT