health-fitness-wellness

Daily योग: एकपाद उत्तानासन कसे करावे? त्याचे फायदे कोणते?

ओटीपोट आणि मांड्याच्या स्नायूंसाठी हे अतिशय उत्तम आसन आहे.

सकाळ डिजिटल टीम

एकपाद उत्तानासनात Eka Pada Uttanasan पाठीवर झोपून केवळ पाय उचलले जाते. ओटीपोट आणि मांड्याच्या स्नायूंसाठी हे अतिशय उत्तम आसन आहे. पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे आकाशाकडे तोंड करून झोपलेली अवस्था. हे आसन करताना पाठीवर झोपून एक पाय ६० ते ९० अंशांपर्यंत वर केला जातो. म्हणूनच या आसनाला एकपाद उत्तानासन असं म्हणतात. (daily yog Eka Pada Uttanasan steps and health benefits)

एकपाद उत्तानासन कसे करावे?

चटईवर किंवा योग मॅटवर पाठीवर झोपावं. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवावेत. दोन्ही हात शरीरालगत ठेवावेत. आता उजवा पाय ६० अंश इतका वर आणावा. यावेळी पाय ताठ ठेवावेत. काही सेकंद थांबून पाय हळूहळू खाली आणावा. हे आसन करताना मान उचलू नये. हीच प्रक्रिया नंतर डाव्या पायाने करावी.

एकपाद उत्तानासनचे फायदे कोणते?

- मांड्या आणि ओटीपोटाचा खालचा भाग बळकट होण्यास मदत होते.

- ओटीपोटातील सर्व अवयवांचे कार्य सुधारते

- कमरेखालील सांधे मोकळे होतात.

- पाठीच्या कण्याचा खालचा भाग मजबूत होण्यास मदत मिळते.

- पचनक्रिया करणाऱ्या अवयवांचे कार्य सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT