Bhadrasan
Bhadrasan  
health-fitness-wellness

Daily योग: कंबरदुखीने त्रस्त आहात? मग करुन पाहा भद्रासन

सकाळ डिजिटल टीम

शारीरिक व्याधींवर मात करायची असेल तर योगासनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. योग केल्यामुळे अनेकांच्या शारीरिक व मानसिक समस्या दूर झाल्याचं आपण साऱ्यांनीच ऐकलं आहे. साधारणपणे वयाची ३५ वर्षे ओलांडली की कंबरदुखी, पायदुखी अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच योगासनांच्या सरावामध्ये भद्रासन नियमितपणे जरूर करा. (daily-yog-steps-and-health-benefits-of-Bhadrasan )

भद्रासन करण्याचे फायदे

१. मांडीचे स्नायू लवचिक होतात.

२. मांडीजवळील भागांचे स्नायू ताणले जातात.

३. ओटीपोटातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.

४. कमरेखालील सांधे मोकळे होतात.

५. या आसनात मांड्या व पोटऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे मांडी, जांघा आणि पार्श्वभाग यांच्यावर ताण येऊन येथील स्नायू बळकट होतात.

६. भद्रासन ही ध्यानाची बैठक तयार करण्यासाठीचे सर्वात उत्तम आसन आहे.

भद्रासन कसे करावे –

प्रथम जमिनीवर पाय पसरुन बसा. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशा पद्धतीने बसा. त्यानंतर दोन्ही हातांनी पायांचे चवडे पकडून स्वत:च्या दिशेने ओढा. मात्र, यावेळी पाय जमिनीला स्पर्श करतील याची काळजी घ्या. तसंच हे आसन करताना पाठीचा कणादेखील ताठ राहिल याकडे लक्ष द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT