Dangerous not to breastfeed for fear of corona 
health-fitness-wellness

कोरोनाच्या भीतीने  स्तनपान न देणे धोकादायक 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना बाधीत मातांनी बाळाला अंगावरील दूध द्यावे, की न द्यावे असा प्रश्‍न अनेक घरात पडला आहे. कोरोनाबाधित मातेने बाळाला दूध न दिल्यास होणाऱ्या धोक्‍यांचा विचार करता, तसेच बाधित मातेने स्वच्छतेची काळजी घेऊन बाळाला अंगावरचे दूध दिल्यास कोरोनाचा धोका कमी आहे. त्यामुळे कोरोना बाधित मातेने बाळला दूध द्यावे, असा आवाहन पिडॅक्‍ट्रीक असोसिएशनचे बालरोग तज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी केले  
दोन महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. यात कोल्हापूर, सांगली भागातही मोठ्या संख्येने गरोदर माता किंवा बाळंतिणी कोरोना बाधित झाल्याचे पुढे आले आहे. 
याबाबत डॉ. मिरगुंडे यांनी बालरोग शास्त्र तसेच नित्य प्रॅक्‍ट्रीक्‍समधील अनुभव व कोरोना जंतू फैलावा, र्निजंतुकीकरण या आधारे केलेल्या अभ्यासातून बाळाला आईचे दूध देणेच आवश्‍यक असल्याचे मत मांडले आहे. 
डॉ. मिरगुंडे म्हणतात, सद्या स्तनपान सप्ताह सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक मातेने स्तनपानाचे महत्व समजून घ्यावे. अनेकदा बाळाला बाटलीचे दूध देण्याची सवय लावली जाते. त्यासाठी बाटली र्निजंतुकीकरण करणे हे महत्वाचे ठरते. तसेच बाटली ऐवजी शक्‍यतो स्तनपान करणे महत्वाचे आहे.'' 
ते म्हणाले, "" स्तनदा मातांनी परस्पर गैरसमज करू न घेता आपल्याला दूध कमी असल्याचे जाणवत असेल तर त्यासाठी बालरोग तज्ञ किंवा स्तनपान समुपदेशकांशी सल्ला मसलत करणे आवश्‍यक आहे. बाळाच्या जन्मानंतरसहा महिने बाळाला स्तनपान महत्वाचे आहे'' 

डॉ. मिरगुंडे म्हणतात 
*मातेचे दूध नैसर्गिक तयार होते 
*स्तनपानामुळे प्रसुती पश्‍चात रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते 
*स्तनापानामुळे गर्भाशय, स्तनाच्या कॅन्सर रोखण्यास मदत होते 
*स्तनपान देणाऱ्या मातांचा बांधा सुडौल होतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT