cancer sakal
health-fitness-wellness

कॅन्सर रोगामुळे होणारे अकाली मृत्यू निश्‍चित टळतील; तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

कर्करोग पीडित रुग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता उत्तम व प्रभावशाली उपचार देणे

दत्ता लवांडे

सोलापूर : सध्या रुग्णांना मिळणाऱ्या उपचारामध्ये जागतिक पातळीवर सुसूत्रता आणणे तसेच कर्करोग पीडित रुग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता उत्तम व प्रभावशाली उपचार मिळवून देणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. यासाठी सर्वच देशातून कॅन्सरचे उपचार हे सहजपणे व आर्थिकदृष्ट्या परवडतील अशा स्वरूपात जर आपण मिळवून देऊ आणि कॅन्सर उपचारातील त्रुटी दूर करू तेव्हाच या रोगामुळे होणारे अकाली मृत्यू आपण टाळू शकतो, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

जागतिक कर्करोग निवारण दिनानिमित्त डॉक्‍टरांशी ‘सकाळ’ने याविषयी संवाद साधला. कर्करोग निवारण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश जनमाणसात कॅन्सरविषयी जागृती करणे, कॅन्सरला प्रतिबंध करणे व कॅन्सरविषयी गैरसमज दूर करून त्याचे प्रभावी उपचार करण्यास प्रोत्साहन देणे हाच असतो. यंदाच्यावर्षी २०२२ ते २०२४ पर्यंत ‘कॅन्सर उपचारातील त्रुटी दूर करा’ असे घोषवाक्‍य देण्यात आले आहे. यावर्षीपासून पुढील तीन वर्षे त्रुटी दूर करण्यावर खास लक्ष देण्याचे ठरविले आहे. इतकी वर्षे आपण निरनिराळ्या कॅन्सरवर विविध मार्गाने उपचार करत आहोत, पण हे उपचार सगळ्या रुग्णांना आदर्श पद्धतीने मिळत नाहीत असे निदर्शनास आले आहे.

इ. स. २०३० पर्यंत कॅन्सरमुळे होणाऱ्या अकाली मृत्यू पैकी ७५ टक्के रुग्ण मध्यम व अल्प उत्पन्न गटातील असतील असे अनुमान काढण्यात आले आहे. या प्रकारच्या उपचाराच्या त्रुटी मागे, शैक्षणिक, आर्थिक, वांशिक, सामाजिक इ. अनेक कारणे आहेत. या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून, सगळ्या कॅन्सर ग्रस्त रुग्णांना समान पद्धतीने उपचार कसे देता येतील व मृत्यू दर कमी करता येईल यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. कोरोनामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना निदान होणे व पर्यायाने मृत्यूची संख्या वाढणे ही गंभीर दुष्परिणाम झाला आहे.

ठळक बाबी...

  • सुमारे ६५० प्रकारचे निरनिराळे कॅन्सरचे प्रकार आहेत

  • स्वतः कृतिशील राहून, इतरांना कृतिशील होण्यास प्रोत्साहन द्यावे

  • आरोग्यमय जीवनशैली राखण्याचा प्रयत्न करावा

  • जनमाणसातील कॅन्सरविषयीचे गैरसमज दूर करावे

  • कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्याच्या कुटुंबियांना मदत करावी

  • दबाव गटांची निर्मिती करून सरकारला सोयी पुरवण्यास भाग पाडणे

आजच्याघडीला तरुणांमध्ये तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णाला उपचार घेताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या तरच तो या आजारावर मात करू शकरणार आहे. त्यामुळे उचारातील त्रुटी दूर होणे गरजेचे आहे.

- डॉ. शिरीष कुमठेकर, कॅन्सर सर्जन तथा सचिव, इंडियन कॅन्सर सोसायटी सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

Railway Employees Protest: रेल्वे आंदोलन परवानगीशिवाय! अहवाल मागवला; कारवाई होणार

Video : थाटात पार पडला जयवंत वाडकरांच्या लेकीचा साखरपुडा ! मल्याळी जावई आणि स्वामी समर्थांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT