ayurveda 
health-fitness-wellness

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पाळा आहार-विहाराचे हे नियम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मनाची घालमेल किंवा मन अशांत असल्याचा परिणाम आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी वर देखील होतो. सध्याच्या काळात हे जग आरोग्याच्या ज्या संकटातून चालले आहेत, त्या कारणामुळे लोकांना निव्वळ मानसिक अस्वस्थताच जाणवत नाही तर त्यांना खाण्यापिण्याकडे लक्ष देखील देता येत नाही. परिणामी त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आयुर्वेदाने आहाराविषयीची काही पथ्ये सांगितली आहेत, त्यामुळे माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहू शकतो.आयूर्वेदात ऋतुमानानुसार आहार सांगितला आहे. कोरोना काळात हा आहार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास नक्कीच मदत मिळेल.

* वाफवून भाज्या खाव्या
भाज्या पूर्णपणे शिजवून न खाता वाफवून खाव्या जेणेकरुन त्यामधील पोषक द्रव्य कायम राहतील.

* कच्चे मसाले भाजून आणि दळूनच वापरावे
प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्चे मसाले तव्यावर भाजून आणि दळून वापरावे. विशेषतः हिवाळा किंवा पावसाळ्यात आलं तव्यावर भाजून खाऊ शकता.

* गव्हाचे चाळलेले पीठ वापरू नये
गव्हात फायबर असतं. पण त्यातील तपकिरी भागात जास्त प्रमाणात फायबर असतं. म्हणून गव्हाचे पीठ न चाळताच वापरावे. कोंडा असलेले पीठ आरोग्यास चांगले मानले जाते.

*थंडगार अन्न खाणे टाळा
थंडगार अन्न खाल्ल्याने पचन क्रिया कमकुवत होते. पोट भरूनं कधीही जेवू नये. आयुर्वेदानुसार पुरेसे अन्न न खाल्ल्याने अन्न सहजच पचतं.

* गोड कमी खावे
आयुर्वेदानुसार गोड कमी खावे. गोड खाण्याचे पर्याय म्हणून आपण मध किंवा गूळ वापरू शकता. हे आपणांस मधुमेह सारख्या आजारापासून वाचवू शकते.

आता थोडे विहाराविषयी

कोरोना पासून वाचण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता हा एकमेव उपाय आहे. म्हणून वारंवार हात धुणं कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्याचा सर्वात अचूक मार्ग आहे. हात वेळोवेळी सॅनेटाईझ करावे. घराच्या बाहेर असल्यास सेनेटाईझरचा वापर करावा. घरात असल्यास साबणाने हात स्वच्छ धुवावे.

* घराबाहेर सतत मास्क वापरावा. वर्दळीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा.

* डोळे चोळू नये कारण डोळ्यातून कोरोना विषाणुचा प्रवेश होऊ शकतो. तसेच चेहऱ्याला पुन्हा पुन्हा हात लावणे टाळावे.

*हस्तांदोलन टाळावे. 'नमस्ते' करणं या कोरोनाच्या काळात सर्वात योग्य आहे.

* मॉल्स किंवा वर्दळ असलेल्या जागी जाणे टाळावे.

* मोबाईल आणि लॅपटॉप वेळोवेळी स्वच्छ आणि सेनेटाईझ करावा.

* बाहेरून घरी आल्यावर आधी अंघोळ करून कपडे बदलून स्वच्छ चांगले कपडे घालावे, त्यानंतरच कुटुंबीयांच्या संपर्कात यावे.

* आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी हर्बल चहाचे सेवन करावं.

* रात्री झोपण्याच्या पूर्वी हळदीचे दुधाचे सेवन करावं हे आपल्या प्रतिकारक शक्तीला किंवा क्षमतेला बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

* सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाने प्रवास करीत असल्यास मास्क आणि ग्लोव्ज वापरावे.
संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War Video: पाकिस्तानात घुसून अफगाणिस्तानचा एअर स्ट्राईक, लष्करी तळ उद्ध्वस्त; व्हिडिओ पुराव्याने खळबळ

Exam Cheating: हद्दच झाली राव! थेट भोंगा लावून सांगितली प्रश्नांची उत्तरे, बारावीच्या परीक्षेत कॉपीचा असाही प्रकार; गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : बदलापूर बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत, आयव्हिएफ सेंटरची तपासणी

Hingoli News: ‘बाबा, माझा पेपर आहे, मला लवकर सलाइन द्या’ मुलाची वडिलांना विनवणी, उपचाराला नेताना मृत्यू

Solapur Couple Case : तरुणाच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्यानं संपवलं जीवन; 'तो' फोनवरून भेटायला बोलवायचा अन्..., अंथरुणात सापडली मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

SCROLL FOR NEXT