health-fitness-wellness

काळजी घ्या! आता कानाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका

कानांसारख्या नाजूक अवयवाची विशेष काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

मिलींद तांबे

मुंबई : ओटिटिस (otitis) म्हणजेच कानाला होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका सध्या वाढताना दिसून येत आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे कान सतत दुखत राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. कानाच्या दुखण्यावर वेळीच निदान व उपचार झाल्यास कान लवकर बरा होऊ शकतो. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार घेऊ नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. (disease-ear-infection-otitis)

ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते, असे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले यांनी सांगितले. दुषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. मात्र अद्यापही कानदुखी सारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत, असे ही डॉक्टर केवले पुढे म्हणाले.

कानात झालेल्या बुरशी लक्षणे

कान लाल होणं, श्रवणशक्ती कमी होणं, कानाच्या आतील त्वचा खराब होणं, कान दुखणं, जळजळ व सूज येणं, कानाच्य त्वचेला रॅश येणं आणि कानात तयार झालेला मळ बाहेर न पडणे ही कानाला बुरशी संसर्ग झाल्याची लक्षणे आहेत.

बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. विशेष म्हणजे एका रुग्णालयात महिन्याला जवळपास ३० ते ४० प्रकरण समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. या आजाराचे रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात तपासणी करून केले जाते. त्यानंतर कानात थेंब आणि औषध देऊन उपचार केले जात आहेत. बुरशी होणे हा गंभीर रोग नसला तरी त्याकडे वेळेच लक्ष देऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. अन्यथा घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असे ही डॉक्टर केवले यांनी सांगितले.

'वयोवृद्धांमध्ये कान दुखण्याची ही एक सामान्य समस्या आहे. कानात संक्रमण झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे', असे झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. शलाका दिघे यांनी सांगितले.

बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी 'हे' करा

कानाला बुरशी संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी कानात पाणी साचू देऊ नका, आंघोळीनंतर कान सुकवा, कानात तेल टाकणे टाळा, कानात मोठ्याने ओरडू नका आणि कान नियमितपणे स्वच्छ करा. कानात मळ साचलेला असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्या. मळ काढण्यासाठी ईअरबड्सचा वापर करणे शक्यतो टाळावेत, असा सल्लाही डॉ. शलाका यांनी दिला.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT