Does your child get thirsty frequently It could be a disease Nagpur news 
health-fitness-wellness

तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला आपोआप तहान लागते. तहान लागण्याची क्रिया ऋतू अनुसार बदलू शकते. म्हणजे थंडीत जास्त तहान लागत नाही. पावसाळयातही कमीच तहान लागते. मात्र, उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तहान काही भागात नाही. मात्र, खूप तहान लागते. कितीही पाणी प्यायला तरी तहान काही भागात नाही. सतत घसा कोरडा पडतो. असे तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल तर सावधान!

तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत असेल तर सावधगिरी बाळगायला हवी. वारंवार लागणारी तहान मुलाला धोकादायक आजाराकडे घेऊन जाऊ शकते. वारंवार तहान लागणे, भूक वाढणे आणि वारंवार लघवी होणे हे मुलांमध्ये मधुमेहाचे लक्षण असू शकते. यामुळे मुलांचे डोळेही जाऊ शकते. मुलांमध्ये साखरेच्या विलक्षण पातळीमुळे त्यांना जास्त तहान लागते.

तुमचे मुलं वारंवार रस, कोल्ड्रिंक आणि पाणी यासारख्या गोष्टींची मागणी करत असेल तर आजच सावधान होऊन जा. तुमच्या मुलांना जास्त तहान येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जेणेकरून मधुमेहावर वेळेवर उपचार करता येतील. मधुमेहाची इतर लक्षणे देखील मुलांमध्ये दिसू शकतात. असे घडत असल्यास ते धोकादायक आहे. जाणून घेऊया यावरील उपाय...

जास्त भूक लागण

मधुमेहाने ग्रस्त असलेले मुले नेहमी भूक लागल्याची तक्रार करीत असतात. त्यांना कितीही आहार दिला तरी शरीरात ऊर्जेचा अभाव असतो. ऊर्जा कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांना सतत काहीतरी खावसं वाटते. मात्र, मधुमेहामुळे मुलाने किती खाल्ले तरी त्याचे वजन वाढत नाही. मधुमेह ग्रस्त मुलांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे त्यांच्या शरीरात सतत ऊर्जेची कमतरता असते. इतर मुलांच्या तुलनेत ते सुस्त राहतात. तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

वारंवार लघुशंका लागणे

भूक आणि तहान जाणवण्याबरोबरच वारंवार बाथरूममध्ये जाणे देखील मुलांमध्ये मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण असू शकते. मोठ्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे दिसली आहेत. आपल्या मुलामध्ये हे लक्षण दिसत असल्यास सावधगिरी बाळगा. त्यांना मधुमेह असू शकतो. म्हणून, वेळीच त्यांच्यावर उपचार करा.

मधुमेहाचे प्रकार

मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. टाइप एक डायबिटीजला इन्सिपिडस म्हणूनही पुष्कळजण ओळखतात. टाइप एक मधुमेहामुळे शरीरात अँटी-डायरेटिक हार्मोनजी (एडीएच) कमतरता उद्भवते. यामुळे आपले शरीर इन्सुलिनचे उत्पादन थांबवते.

टाइप दोन मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन आवश्यकतेपेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत आपले शरीर इन्सुलिनची ओळख पटवू शकत नाही. यामुळे शरीरात याचा वापर थांबतो. म्हणूनच टाइप दोन मधुमेहास इन्सुलिन प्रतिरोधकता देखील म्हटले जाते.

मुलांना मधुमेहापासून कसे वाचवाल

  • नियमित व्यायाम करा
  • जंक फूडपासून दूर रहा
  • तणावापासून दूर रहा
  • मोबाईलवर जास्त खेळू नका
  • मैदानी खेळ खेळायला सांगा
  • साखरेचे सेवन कमी करा
  • पांढरी ब्रेड, मिठाई, पेस्ट्री, सोडा आणि इतर रिफायनरी वस्तूंचा वापर कमी करा

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT