Diet Pland Plan Sakal
health-fitness-wellness

हेल्दी डाएट : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचा आहार

बदलते हवामान जगातील अनेक लोकांसाठी चिंतेचे प्रमुख कारण आहे.

सकाळ वृत्तसेवा

बदलते हवामान जगातील अनेक लोकांसाठी चिंतेचे प्रमुख कारण आहे.

- डॉ. रोहिणी पाटील

बदलते हवामान जगातील अनेक लोकांसाठी चिंतेचे प्रमुख कारण आहे. हे फक्त बदलत्या तापमानामुळे किंवा पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळेच नाही, तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत देखील आहे. पावसाळा सुरू होताच लोकांना श्वसनाचे व इतर आजार होऊ लागले आहेत. या काळात सर्दी-खोकल्यापासून आपला बचाव करून स्वत:ला निरोगी ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला कोरडे ठेवून, शरीराची ऊब जपण्यासह आपला आहार योग्य ठेऊन देखील हे साध्य केले जाऊ शकते.

काही औषधी वनस्पती आणि मसाले केवळ आपल्या जेवणाची चवच वाढवत नाहीत, तर त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म देखील असतात. ओवा, दालचिनी, बडीशेप, काळी मिरी, तुळस, हळद, आले, वेलची या औषधी वनस्पती आणि मसाले घराघरांत आढळतात. या पदार्थांपासून बनवलेला काढा हा पावसाळ्यात एक दिवसाड घेणे उत्तम पर्याय आहे. तथापि, जेष्ठमध, शेवरीचा कापूस, रुईबोस चहाची पाने, गवती चहा, तुळशीची पाने, ग्रीन टीची पाने आणि लिंबाचा अर्क तुम्हाला न्यूट्रसी लाइफस्टाइलच्या हर्बल डिटॉक्स चहामध्ये मिळू शकेल.

प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठीची पेये

पहाटे

  • रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या हळदीचा शॉट : हळद, काळी मिरी आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळा.

नाश्ता

  • पर्याय १ : लसूण चटणीसह धणे आणि तीळ पराठा

  • पर्याय २ : नारळाच्या चटणीसह मूग इडली

  • सकाळी १०/११ : एक पेरू किंवा आवळा

दुपारचे जेवण

  • दाळ पालक/रताळे आणि भोपळा करीसह मल्टीग्रेन रोटी

स्नॅक्स

  • न्यूट्रसी हर्बल डिटॉक्स टीसह मिक्स सीड्सचे लाडू

रात्रीचे जेवण

  • पर्याय १ : कढी भात

  • पर्याय २ : ओट्स व्हेजिटेबल खिचडीसह १ छोटा कप काढा

यांतून मिळणारी पौष्टिक मूल्ये

  • कॅलरी : १३६३किलो कॅलरिज

  • प्रथिने : ४० ग्रॅम

  • चरबी : २७ ग्रॅम

  • कर्बोदक : २४६ ग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT