health-fitness-wellness

हेल्दी डाएट : इंटरमिटंट फास्टिंगच्या फायद्यांसाठी...

श्रावणातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात हलक्या आहाराने सुरू होते. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये तुमचे मुख्य जेवण आणि स्नॅक्स सुरू ठेवा.

सकाळ वृत्तसेवा

श्रावणातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात हलक्या आहाराने सुरू होते. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये तुमचे मुख्य जेवण आणि स्नॅक्स सुरू ठेवा.

- डॉ. रोहिणी पाटील

श्रावणातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात हलक्या आहाराने सुरू होते. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये तुमचे मुख्य जेवण आणि स्नॅक्स सुरू ठेवा, मात्र या दरम्यान तुम्ही कोणतेही जड पदार्थ टाळणे अपेक्षित आहे, ज्यांना पचायला बराच वेळ लागतो. इंटरमिटंट फास्टिंगचे जास्तीत जास्त फायदे कसे मिळवावे?

1) व्यायाम - इंटरमिटंट फास्टिंग करणे म्हणजे कॅलरी आणि व्यायाम यांच्यातील संतुलन राखणे. हे लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे, की इंटरमिटंट फास्टिंगदरम्यान व्यायाम केल्याने तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. व्यायाम करताना तुम्ही जास्त कॅलरी जाळता, त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंगच्या दिवसांमध्ये तुम्ही धावणे, जॉगिंग किंवा सायकलिंगसारखे काही कार्डिओ व्यायाम करणे उत्तम असते.

2) कार्बोहायड्रेटचे प्रमाण - कमी कार्बोहायड्रेट्चा आहार आपल्या शरीरात जाणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मर्यादित करतो. अशा प्रकारच्या आहारामध्ये केवळ कमी कार्बोहायड्रेट्स असणाऱ्या गोष्टी, जसे की भाज्या, फळे, कडधान्ये आणि ब्रेड यांचा समावेश असतो. मात्र, त्यात हेल्दी फॅट्स आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. आहारातील उच्च कार्बोहायड्रेट मेंदूचे कार्य चांगले करण्यास हातभार लावतात.

3) गाढ झोप - इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा फायदा योग्य उत्तम हीलिंग आणि रिकव्हरी प्रक्रियेसह अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो. दररोज योग्य रिकव्हरी प्रोसेस मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रात्री चांगली, गाढ झोप घेणे. खरेतर, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने तुमच्या सामान्य जेवणाच्या तुलनेत आरईएम झोप (गाढ झोपेची अवस्था) प्रति रात्र सुमारे १५ मिनिटे वाढते.

याचा अर्थ एखाद्याने दिवसातून १२ तास उपवास केल्यास त्याला रात्री नेहमीपेक्षा गाढ झोपेचा अधिक फायदा होतो!

श्रावणाच्या तिसऱ्या आठवड्यातील आहार

  • सकाळी - १ लिटर पाणी प्या.

  • नाश्ता - वगळा- (इंटरमिटंट फास्टिंग सुरू ठेवा).

  • दुपारचे जेवण

पर्याय १ - दोन शिंगाडा आट्याचे थालीपीठ + कोणतीही घरगुती करी + १ वाटी काकडी कोशिंबीर.

पर्याय २ - १ वाटी वरीचे तांदूळ + १ वाटी शेंगदाणा आमटी + १ मध्यम वाटी शेंगदाणे आणि बटाट्याची भजी.

  • संध्याकाळचा नाश्ता - १ कप हर्बल टी/ ग्रीन टी (साखरे शिवाय).

  • रात्रीचे जेवण

पर्याय १ - एक ग्लास केसर दुधासह १ वाटी रताळे. (बदामाचे दूध)

पर्याय २ - १ खजूर आणि ड्रायफ्रुट्स लाडू + १ ग्लास दूध. (बदाम दूध)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT