Healthy Diet Sakal
health-fitness-wellness

हेल्दी डाएट : उन्हाळ्यासाठी भारतीय आहार

उन्हाळा जवळ आल्यावर देशभरात लोक हंगामी फळांच्या शोधात असतात. उन्हाळ्यात हलके अन्न खाणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि हे तुम्ही उपाशी न राहता ही सहज करू शकता.

सकाळ वृत्तसेवा

उन्हाळा जवळ आल्यावर देशभरात लोक हंगामी फळांच्या शोधात असतात. उन्हाळ्यात हलके अन्न खाणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि हे तुम्ही उपाशी न राहता ही सहज करू शकता.

- डॉ. रोहिणी पाटील

उन्हाळा जवळ आल्यावर देशभरात लोक हंगामी फळांच्या शोधात असतात. उन्हाळ्यात हलके अन्न खाणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि हे तुम्ही उपाशी न राहता ही सहज करू शकता. तुम्हाला माहीत आहे का, तुमचा उन्हाळ्यातील आहार हा इतर ऋतूंपेक्षा वेगळा असायला हवा? कारण विविध प्रकारच्या हंगामी रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी आहारात ऋतुमानानुसार बदल करणे आवश्यक असते. सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार करून उन्हाळ्यात आपण अन्न सेवन केले पाहिजे. अत्यंत मसालेदार, गरम, पोटाला जड आणि तळलेले अन्न खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे अतिसार, पोटदुखी, निर्जलीकरण, त्वचेच्या समस्या, शरीरातील ऊर्जा कमी होणे आणि थकवा जाणवणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सर्वांनी हे खालील मुद्दे ध्यानात ठेवावेत.

  • आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

  • स्वयंपाक करताना कमी मसाले वापरा.

  • तुम्ही खात असलेला आहार हलका आहे याची खात्री करा.

  • वेगवेगळी आरोग्यदायी पेये आणि रसांच्या मदतीने शरीरातील द्रव्यांची पातळी चांगली ठेवा.

निरोगी उन्हाळी डाएट प्लॅन

पहाटे

१/४ लिटर पाण्यात १ संपूर्ण लिंबू घाला.

नाश्ता-

पर्याय १ - १ ग्लास प्रथिनेयुक्त स्मूदी.

पर्याय २ - १ बाउल घरगुती पोहे किंवा उपमा

सकाळी १०-११च्या सुमारास

१ वाटी कलिंगड किंवा १ वाटी खरबूज किंवा १ वाटी आंबा.

दुपारचे जेवण

१ वाटी नाचणी आंबिल

संध्याकाळचा स्नॅक्स

१ ग्लास पन्हे किंवा १ ग्लास सातू पेय

रात्रीचे जेवण

पर्याय १

१ वाटी मूग डाळ खिचडी (१ चमचा तूप घाला) + १ ग्लास ताक

पर्याय २

१ ज्वारी भाकरी + १ वाटी कोणतीही हंगामी भाजी.

कॅलरीज (ऊर्जा) - १०९७ किलोकॅलरी

प्रथिने - २१.९८ ग्रॅम

कर्बोदके - २१४.२१ ग्रॅम

फॅट - ७.५८ ग्रॅम

फायबर - ८.५ ग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT