health-fitness-wellness

हिवाळ्यात खाल गाजराचा हलवा, रहाल फायद्यात

या काळात लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात येतात

सकाळ डिजिटल टीम

भारतात हिवाळ्याच्या (winter) दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा(carrot halwa). सर्वच वयोगटातील लोकांना गाजराचा हलवा आवडतो. या काळात लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात येतात. ते गाजर किसून त्यात तूप, साखर दूध किंवा मावा, नट्स घालून केलेला हा हलवा अतिशय चविष्ट लागतो. तो करायला मुबलक वेळ जरी लागत असला तरी चव चांगली असल्याने केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

गाजराचा हलवा आरोग्य आणि पौष्टीकतेचा एक उत्तम कोम्बिनेशन आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही साखरेच्या जागी गुळाचा वापर करून हलवा आणखी पौष्टीक करू शकता. निरोगी राहण्यासाठी आहारतज्ज्ञ नेहमीच हंगामी फळे आणि भाज्या खाणे चांगले असल्याचे म्हणतात. त्यामुळेच या हिवाळ्यात तुम्ही गाजर हलवा खाऊन निरोगी राहू शकता.

गाजर हे कुठल्याही सिझनला खाणे चांगले. पण हिवाळ्यात मिळणारी लालचुटूक गाजरांचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. गाजरामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असते. व्हिटॅमिन ए दृष्टी, चांगली त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच अँटिऑक्सिडंट्साठी महत्वाचे आहे, असे अहमदाबादच्या नारायण हृदयालय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वरिष्ठ क्लिनिकल डायटीशियन श्रुती भारद्वाज सांगतात.

हिवाळ्यात अनेक लोकं गाजराचे सॅलेड करतात किंवा त्याचा ज्यूस पिणे पसंत करतात. पण, गाजर शिजवल्याचे काही फायदे आहेत. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते. ते संत्र तसेच काही भाज्यांमध्ये आढळते. जेव्हा आपण शिजवलेले गाजर खातो तेव्हा आपले शरीर कच्च्या गाजराच्या तुलनेत शिजवलेले गाजर चांगल्या प्रकारे शोषू शकते. तसेच त्यामुळे अधइक प्रमाणात बीटा कॅरोटीन मिळते, असे भारद्वाज सांगतात. तर दूधामुळे प्रथिनं, कॅल्शिअम मिळते. त्यामुळे हलव्याचे पोषणमूल्य वाढते. तसेच दूध हाडांची घनताही वाढवते.

हलव्यात आपण तूप घालतोच. तूप हे अमीनो ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. तुपामुळे तुमची त्वचा निरोगी राहते आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे हिवाळ्यात गाजर हलवा खाल्ल्याने तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT