Orange
Orange 
health-fitness-wellness

थंडीत संत्री खाणे फायद्याचे, शरीराला होतात 'हे' 5 फायदे

सकाळ डिजिटल टीम

नोव्हेंबर- डिसेंबर दरम्यान बाजारात संत्री यायला लागतात. गोड संत्री सगळ्याच वयोगटातील लोकांना खूप आवडतात. हिवाळ्यात शरीराला व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी संत्रे खाते अतिशय चांगले समजले जाते. तुमच्या जिभेची चव टिकून राहावी यासाठी तसेच व्हिटामिन सी मिळण्यासाठी संत्रं या काळात खायला हवे. संत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीत आजारापासून वाचण्यासाठी आपल्याला तब्येतीची काळजी घ्यावी लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संत्रे खाणे अतिशय चांगले आहे. याशिवाय आणखीही काही फायदे आहेत.

रक्तदाब नियंत्रणात राहतो- संत्र्यात असलेल्या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते. संत्र रोज खाल्ल्यास बीपीची समस्या दूर होते. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना संत्रं खाण्यास सांगतात. यात व्हिटामिन बी असल्यामुळे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. संत्र्यातील पोषक तत्वांमुळे हार्ट रेट आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच हाडेही मजबूत होतात.
त्वचा चमकदार राखण्यास मदत - संत्र्यामध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते. तुमची त्वचा चमकदार राहण्यासाठी संत्रे खूप मदत करते. संत्र्यामुळे तुमची त्वचाही निरोगी राहते. फक्त चेहराच नाही तर त्वचेवर काही डाग, चट्टे असतील तर तेही कमी होतात. म्हणून अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये संत्र्याचा वापर केला जातो. संत्र्याचा फॅस पॅक, मास्क त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो.
किडनी स्टोनची समस्या दूर- किडनी स्टोनची समस्या असल्यास ती संत्रं खाल्ल्याने दूर होते. संत्र्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. संत्र्यातील विटामिन सी मुळे किडनी स्टोन कमी करायला मदत होते. नैसर्गिक औषध म्हणून ते काम करते.
पोटाची समस्या होते दूर- संत्र्याचा रस गरम करून त्यात काळे मीठ, डाळिंबचा रस एकत्र करून प्यायल्याने पोटदुखीची मस्या कमी होते. तसेच गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अपचन, सूज, इफेक्शन यासारख्या समस्या दूर होतात.संत्र्याच्या रसात फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे चांगल्या पचनासाठी संत्रे फायदेशीर असते.
डोळ्यांसाठी फायदेशीर -विटामिन ए डोळ्यांसाठी अतिशय चांगले मानले जाते. ते चांगल्या प्रमाणात संत्र्यात असते. संत्र्यामध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन होते. संत्रे खाल्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT