Fruit 
health-fitness-wellness

हिवाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळांचे सेवन कराच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जगभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जो तो आपापल्या परिने प्रयत्न करीत आहे आणि काळजी घेतो आहे. त्यात आपली प्रतिकारशक्ती जास्त असेल तर आपण कोरोनापासून बचाव नक्कीच करू शकतो. तसेच ज्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांनी ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि योग्य फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. 

गुलाबी थंडीची चाहूल सुरु होत आहे. या दिवसात काही गोष्टींपासून दूर राहण्यासाठी बहुतेक लोक यावेळी पेय, रस किंवा ग्रीन टी पितात. हिवाळ्याच्या दिवसात बरीच फळे उपलब्ध असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि यामुळे शरीर संक्रमणास लढण्यास मदत करते. या दिवसात जितकी जास्त फळे खाल तितकी प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच दिवसातून एखादे फळ तरी खाल्लेच पाहिजे. तर आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. 

संत्री - संत्री हे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम दोन्हीचा चांगला स्रोत मानला जातो. यामुळे हंगामी संक्रमणाचा धोका कमी होतो आणि याचे सेवन केल्यास शरीर आतून मजबूत बनते. जर आपल्याला संत्री आवडत असेल तर आपण त्याचा रसही पिऊ शकता.

पेरू - पेरू हा हिवाळ्यातील आवडते फळ मानले जाते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात मिळते. जे शरीरातील संक्रमणांशी लढते आणि पेशींना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यापासून संरक्षण करते. पेरूमध्ये फायबरही जास्त प्रमाणात आढळते, जे हृदय आणि रक्तातील साखरेसाठी चांगले मानले जाते.

सफरचंद - सफरचंद हे फळ  लहानापासून ते मोठ्यांपर्यत सर्वांच्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीरातून जळजळ कमी करते. पेक्टिन, फायबर, व्हिटॅमिन सी आणि के सफरचंदांमध्ये असतात. हे फळ पौष्टिकपणाने भरलेले असल्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत करते.

डाळिंब - डाळिंब हे फळ गोड असल्यामुळे अनेकजण ते फळ खाण्यास प्राधान्य देतात. डाळिंब खाल्याने ब्लड सौम्य करते. जे रक्तदाब, हृदय, वजन कमी करणे आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते.

मौसंबी - मौसंबी हे एक आंबट फळ आहे जे व्हिटॅमिन सी ने भरलेले आहे. हे फळ खाण्यास चवदार आहे आणि त्याचा रसही आवडीने पिला जातो. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT